नागझरीतले ५०० एमएलडी पाणी घटले

By Admin | Published: August 19, 2016 12:49 AM2016-08-19T00:49:14+5:302016-08-19T01:01:58+5:30

लातूर : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लातूर शहरासह जिल्ह्यात फक्त एक मोठा पाऊस झाल्यामुळे मांजरा नदीवरील नागझरी व साई बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले़

500 MLD water in Nagpur has decreased | नागझरीतले ५०० एमएलडी पाणी घटले

नागझरीतले ५०० एमएलडी पाणी घटले

googlenewsNext


लातूर : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लातूर शहरासह जिल्ह्यात फक्त एक मोठा पाऊस झाल्यामुळे मांजरा नदीवरील नागझरी व साई बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले़ त्यामुळे शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे़ मात्र या दोन्हीही बॅरेजेसमधील पाणी झपाट्याने उतरत आहे़ नागझरी बॅरेजेसमधील ५०० एमएलडी पाणी घटले आहे़ शहरासाठी गेल्या १८ दिवसात २२० एमएलडी पाणी उचलले असले तरी बॅरेजेसमधील पाणी त्या तुलनेत झपाट्याने उतरले आहे़ यामुळे लातूर शहराच्या पाणीपुरवठ्या संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे़
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या एका पावसात नागझरी बॅरेजेसमध्ये ३़३० एम़एमक़्युब पाणीसाठी झाला होता़ तर साई बॅरेजेसमध्ये ०़२२ एमएमक्युब पाणी संकलित झाले़ लातूरकरांना मोठा आनंद झाला़ महानगर प्रशासनानेही तत्काळ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला़ मात्र त्यानंतर लातूर शहर व परिसरात पाऊस झाला नाही़ तब्बल अठरा दिवस झाले, या अठरा दिवसात मोठा एकही पाऊस झाला नसल्यामुळे बॅरेजेसमध्ये पाणीसाठा झाला नाही़ उलट संकलित झालेले पाणी झपाट्याने उतरत आहे़ ३़३० एमएमक्युब नागझरी बॅरेजेसमध्ये पाणी होते़ मात्र आता या बॅरेजेसमध्ये २़८ एमएमक्युब पाणी आहे़ पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी कालच या प्रकल्पातील उपलब्ध पाण्याची चाचपणी घेतली असता ०़५० एमएमक्युबने पाणी उतरले असल्याचे निदर्शनास आले आहे़
लातूर शहरासाठी दररोज नागझरी येथून १२ एमएलडी पाणी उचलण्यात आले आहे़ गेल्या १८ दिवसात ०़२२ एमएमक्युब पाणी उचलण्यात आले आहे़ मात्र त्या तुलनेत अधिक पाणी घटले आहे़ ०़२८ एमएमक्युब पाणी वापर न होता घटले आहे़ तसेच साई बंधाऱ्यात ०़२२ एमएमक्युब पाणीसाठा झाला होता़ यातीलही १़५० एमएलडी पाणी घटले आहे़ बाष्पीभवन होऊन तसेच चर खोदल्यामुळे पाणी आतल्या आत मुरत आहे़ त्यामुळेच ०़२८ एमएमक्युब पाणी वापर न होता घटले असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी निष्कर्ष काढला आहे़ पाणी मोठ्या प्रमाणात घटत असल्यामुळे महानगर पालिका प्रशासनाला भविष्यातील पाण्याची चिंता वाटत आहे़ योग्य नियोजनाची गरज आहे़ (प्रतिनिधी)
लातूर शहरात १ आॅगस्टपासून नळाने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे़ नागझरी व साई प्रकल्पातून दररोज १२ ते १५ एमएलडी पाणी उचलण्यात आले असून, आतापर्यंत २२० एमएलडी पाणी मनपाने या दोन्हीही प्रकल्पातून उचलले आहे़ दरम्यान, १ ते १७ आॅगस्ट दरम्यान शहरात नळाद्वारे पाणीपुरवठ्याची पहिली फेरी पूर्ण झाली आहे़ मात्र बॅरेजेसमधील पाणी झपाट्याने उतरत आहे़ शिवाय, पावसानेही ओढ दिली आहे़ त्यामुळे पाण्याची चिंता मनपा प्रशासनाला परत भेडसावत आहे़

Web Title: 500 MLD water in Nagpur has decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.