३२८५ ग्राहकांची वीज तोडली

By Admin | Published: January 21, 2017 12:06 AM2017-01-21T00:06:18+5:302017-01-21T00:11:39+5:30

औरंगाबाद : महावितरण कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ३ हजार २८५ वीज ग्राहकांचे कनेक्शन कापले.

3285 customers' electricity was broken | ३२८५ ग्राहकांची वीज तोडली

३२८५ ग्राहकांची वीज तोडली

googlenewsNext

औरंगाबाद : महावितरण कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ३ हजार २८५ वीज ग्राहकांचे कनेक्शन कापले. १९ कोटी ३० लाख रुपये थकबाकीसाठी त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
वारंवार सूचना देऊनही वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या १७५२ ग्राहकांचा वीजपुरवठा १८ कोटी ९६ लाख रुपये थकबाकीपोटी कायमस्वरुपी खंडित करण्यात आला. तर ४ हजार १३० वीज ग्राहकांकडून १७ कोटी ६४ लाख रुपये वसूल करण्यात आले. दोन्ही जिल्ह्यांत ३१ डिसेंबर २०१६ ते आजपर्यंत वीज बिल थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची मोहीम कंपनीने राबविली. या मोहिमेत औरंगाबाद शहरातील ७ कोटी २८ लाख रुपये थकबाकी असलेल्या १ हजार ९२ वीज ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. तर १३ कोटी ७ लाख रुपये थकबाकीपोटी १ हजार ४८ वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीज कापली.
२५१४ वीज ग्राहकांकडून १० कोटी ४५ लाख रुपये वसूल करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणमध्ये १ कोटी ५५ लाख रुपये थकबाकी असलेल्या ५४८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपासाठी कापला. तसेच २३० ग्राहकांचा ६६ लाख थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा कापण्यात आला. तर ९३० वीज ग्राहकांकडून ५ कोटी ५९ लाख रुपये वसूल करण्यात आले. जालना जिल्ह्यात १० कोटी ४५ लाख थकबाकी असलेल्या १६४५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ४७४ ग्राहकांचा ५ कोटी २२ लाख रुपये थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर ६५६ वीज ग्राहकांकडून ९ कोटी ५९ लाख रुपये वसूल करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: 3285 customers' electricity was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.