एसबीआय रनर्सतर्फे ३० क्विंटल धान्य दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 09:44 PM2019-01-20T21:44:18+5:302019-01-20T21:44:35+5:30

शहरातील एसबीआय कर्मचाऱ्यांनी एसबीआय रनर्स नावाचा सामाजिक ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपतर्फे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला ३० क्विंटल धान्य देण्यात आले.

30 quintal grain donation by SBI runners | एसबीआय रनर्सतर्फे ३० क्विंटल धान्य दान

एसबीआय रनर्सतर्फे ३० क्विंटल धान्य दान

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील एसबीआय कर्मचाऱ्यांनी एसबीआय रनर्स नावाचा सामाजिक ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपतर्फे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला ३० क्विंटल धान्य देण्यात आले.


एसबीआय रनर्सतर्फे मॅरेथॉन, ट्रेक, कॅम्पिंग असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. या सगळ्या पलिकडे आपण समाजाचेही देणं लागतो, या उदात्त भावनेतून ‘धान्याचे दान’ हा अभिनव उपक्रम प्रशासकीय कार्यालय औरंगाबाद-१ चे उपमहाप्रबंधक शेषू बाबू पल्ले यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. सर्व कर्मचाºयांनी तीन दिवसांत ३० क्विंटलपेक्षा अधिक धान्य जमा करून १७ जानेवारी रोजी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टला दान के ले. ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी हे गेली अनेक वर्षे अनाथ मुलांसाठी काम करीत आहेत.


एसबीआय प्रशासकीय कार्यालय औरंगाबाद-१ च्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी शेषू बाबू पल्ले यांच्यासह सहायक महाप्रबंधक आशुतोष कुमार, निलम उपाध्याय, विलास शिंदे, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रताप हंद्राळे, अ‍ॅवॉर्ड स्टाफ युनियनचे महेश गोसावी, मुख्य प्रबंधक (मानव संसाधन) सुनिता पुराणिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूषण वेताळ, संतोष अय्यर, अभिषेक भालेकर, रुपाली पंडित, ज्योत्सना राऊत, सिद्धार्थ पठारे, मिहिर देऊळे, उदय सदावर्ते, ओम तोतेवाड यांनी प्रयत्न केले.

Web Title: 30 quintal grain donation by SBI runners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.