औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन; प्रमाण वाढल्याने डॉक्टरांवर ताण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 11:19 AM2017-12-21T11:19:53+5:302017-12-21T12:34:56+5:30

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

3 thousand postmortem in Aurangabad district during the year; Stress on doctors due to increase in the standard | औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन; प्रमाण वाढल्याने डॉक्टरांवर ताण 

औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन; प्रमाण वाढल्याने डॉक्टरांवर ताण 

googlenewsNext
ठळक मुद्देमृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिकशहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात दररोज ८ ते १० शवविच्छेदन होतात. येथील शीतगृहात २० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे, दिवसेंदिवस या ठिकाणी शवविच्छेदनाचे प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी २ हजार ४८० तर गतवर्षी २ हजार ५०० तर यंदा हा आकडा आतापर्यंत २५०० वर पोहोचला आहे. आगामी दहा दिवसांत हा आकडा २ हजार ६०० वर पोहोचेल,असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले. 

दुसरीकडे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णालयांत वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाले. त्यामुळे घाटी रुग्णालयावर शवविच्छेदनाचा किती भार आहे, हे स्पष्ट होते. घाटीतील शवविच्छेदनगृहात एकावेळी दोन ते तीन डॉक्टर कार्यरत असतात. डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्यातून मृत्यूचे कारणही स्पष्ट होते. डॉक्टरांनी नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणावर शंका असेल, तर शवविच्छेदन केले पाहिजे; अन्यथा जर मृत्यूचे कारण स्पष्ट असेल, तर शवविच्छेदन करण्याचे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदन होतात.  मेडिकोलीगल केसेस आणि अन्य कारणांमुळे शवविच्छेदन करणे आवश्यक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

तीनशेवर शवविच्छेदन
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयात वर्षभरात ३८९ शवविच्छेदन झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली.

...असा आहे ताण
घाटीत शवविच्छेदनासाठी ७ वरिष्ठ डॉक्टर, तर ४ ज्युनिअर डॉक्टर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना शिकविणे आणि शवविच्छेदनाबरोबर न्यायालयात साक्ष देणे, शवविच्छेदन अहवाल पूर्ण करणे, पोलिसांच्या शंकांना उत्तरे देणे अशी अन्य जबाबदारीही डॉक्टरांना पार पाडावी लागत आहे. १ हजार शवविच्छेदनासाठी सध्याचे हे डॉक्टर्स पुरेसे आहे; परंतु प्रत्यक्षात अडीच हजारांवर शवविच्छेदन होतात. प्रत्येक ५०० शवविच्छेदनासाठी २ पोस्ट वाढल्या पाहिजे. येथील कामाचे स्वरूप पाहता ६ डॉक्टरांची आवश्यकता आहे,असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या कारणांसाठी होते शवविच्छेदन
१. विविध अपघाती मृत्यू.
२. मारहाण, खून अशा गुन्हेगारी घटनांतील मृत्यू.
३. विष प्राशन, अन्नातून विषबाधेतून मृत्यू.
४. गळफास आणि आत्महत्या प्रकरणे.
५. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप.
६. शंकास्पद मृत्यूसह अन्य काही कारणे.
७. वीज पडणे, पूर अशा नैसर्गिक आपत्कालीन घटनांतील मृत्यू.

विम्यासाठी शवविच्छेदन गरजेचे
आपत्कालीन मृत्यू, गुन्हेगारी घटनेतील मृत्यू, अपघाती मृत्यू,आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यक ठरतो. आजारपणामुळे मृत्यू झाल्यास शवविच्छेदनाची गरज नसते. विम्याच्या क्लेमसाठी शवविच्छेदन आवश्यक आहे.
-अ‍ॅड. अंगद कानडे-भाटसावंगीकर

...तर शवविच्छेदन टाळता येते
ज्या प्रकरणात मृत्यूचे कारण डॉक्टरांना पूर्ण माहिती आहे आणि पोलिसांना ते मान्य असेल, तर शवविच्छेदन टाळता येते; परंतु याचे प्रमाण कमी आहे.‘एमएलसी’ नोंद झाली असेल, संशयास्पद मृत्यू झालेला असेल, मृत्यूचे कारण सांगता येत नसेल तर अशावेळी शवविच्छेदन आवश्यक ठरते.
- डॉ. के. यू. झिने, विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र, घाटी रुग्णालय
 

Web Title: 3 thousand postmortem in Aurangabad district during the year; Stress on doctors due to increase in the standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.