१६ हजार शेतकºयांचाच पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:06 AM2017-07-26T01:06:50+5:302017-07-26T01:07:38+5:30

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २० जून ते २५ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकºयांपैकी फक्त १५ हजार ८९६ शेतकºयांचाच बँकांनी पीक विमा काढला

16-hajaara-saetakaoyaancaaca-paika-vaimaa | १६ हजार शेतकºयांचाच पीक विमा

१६ हजार शेतकºयांचाच पीक विमा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. तीन लाख २० हजार शेतकरी अजूनही विमा काढण्याच्या प्रतीक्षेत

मारोती जुंबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २० जून ते २५ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकºयांपैकी फक्त १५ हजार ८९६ शेतकºयांचाच बँकांनी पीक विमा काढला असून आता फक्त पाच दिवसांमध्ये उर्वरित तीन लाख २० हजार शेतकºयांचा पीक विमा काढण्याचे डोंगरा एवढे उद्दिष्ट बँकांसमोर आहे. सद्यस्थितीत बँकांमधून होत असलेल्या कामानुसार हे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य असल्याने पीक विमा भरण्यास मुदतवाढ देणे क्रमप्राप्त होणार असल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
यावर्षी जिल्हा कृषी कार्यालयाने खरीप २०१७ या हंगामात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यापैकी २४ जुलैपर्यंत ४ लाख ५२ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. या शेतकºयांना २० जून ते ३१ जुलै या दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, बाजरी, भात आदी पिकांचा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आॅनलाईन पद्धतीने आपल्या पिकांचा पीक विमा उतरविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकºयांचा पीक विमा भरण्यासाठी वाढता कल पाहता काही दिवसांपूर्वी शेतकºयांची बॅकेत एकच गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३७४ महा ई-सेवा केंद्रावर पीक विमा भरण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली.
दिलेल्या मुदतीत शेतकºयांना आपल्या पिकांचा विमा उतरविता यावा, हा उद्देश होता. पीक विम्याचा आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी लागणारा २४ रुपयांचा खर्चही शासन महा ई-सेवा केंद्रांना देणार आहे. परंतु, जिल्ह्यातील बँकां शेतकºयांचा पीक विमा स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहेत.
बँकेत आलेल्या शेतकºयांना महा ई-सेवा केंद्रांचा रस्ता दाखवला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. महा ई-सेवा केंद्रावर गेल्यानंतर सर्व्हर डाऊनची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकºयांना महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून पीक विमा भरण्यासाठी एक-एक दिवस वाट पहावी लागत आहे. २० जून ते २४ जुलै या कालावधीत केवळ १५ हजार ८९६ शेतकºयांनीच पीक विमा उतरविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाख २० हजार शेतकरी अजूनही विमा काढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे उर्वरित पाच दिवसांत आपल्या पिकांचा विमा उतरविणे होईल का? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून प्रत्येक बँकांना पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: 16-hajaara-saetakaoyaancaaca-paika-vaimaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.