वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्यमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:37 AM2018-01-31T04:37:24+5:302018-01-31T04:37:50+5:30

तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या मुरमाडी जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात गिताताई तात्याजी पेंदाम (४५ रा. मुरमाडी) ही महिला जागीच मृत्युमुखी पडली.

 Women killed in Tiger attack | वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्यमुखी

वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्यमुखी

googlenewsNext

सिंदेवाही (चंद्रपूर) : तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या मुरमाडी जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात गिताताई तात्याजी पेंदाम (४५ रा. मुरमाडी) ही महिला जागीच मृत्युमुखी पडली. ही घटना एफडीसीएमच्या कक्ष क्र. १७१ मध्ये मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
गिताबाई पेंदाम या चार महिलांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रअधिकारी एम. आर. जिंगलवार, क्षेत्रधिकारी के. आर. गोंड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मनुष्यप्राणहानी झाल्याची तीन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.
मुरमाडी, किन्ही जंगल परिसरात मागील दोन महिन्यांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र, अद्याप वाघाचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावकरी दहशतीत आहेत.

Web Title:  Women killed in Tiger attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ