वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:17 PM2019-03-23T22:17:31+5:302019-03-23T22:17:50+5:30

चिमूर तालुक्यातील मासळ बु. येथून जवळ असलेल्या मानेमोहाळी येथील झित्रुबाई देवस्थानजवळ असलेल्या शेतात शेतकरी सुभाष करारे मोटारपंप बंद करण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला केला. परंतु सुदैवाने या हल्ल्यातून सुभाष करारे थोडक्यात बचावला. त्यानंतर वाघ तिथेच दबा धरून बसला. याची माहिती मिळताच नागरिकांची एकच गर्दी उसळली. अखेर वनविभागाने फटाके फोडून वाघाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले.

Wagha's farmer attacked | वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला

वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला

Next
ठळक मुद्देथोडक्यात बचावला : वाघाला फटाके फोडून पिटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ बु : चिमूर तालुक्यातील मासळ बु. येथून जवळ असलेल्या मानेमोहाळी येथील झित्रुबाई देवस्थानजवळ असलेल्या शेतात शेतकरी सुभाष करारे मोटारपंप बंद करण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला केला. परंतु सुदैवाने या हल्ल्यातून सुभाष करारे थोडक्यात बचावला. त्यानंतर वाघ तिथेच दबा धरून बसला. याची माहिती मिळताच नागरिकांची एकच गर्दी उसळली. अखेर वनविभागाने फटाके फोडून वाघाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले.
नेरी वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या मानेमोहाळी परिसरातील झित्रुबाई देवस्थानजवळ सुभाष करारे यांचे शेत आहे. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात मोटारपंप बंद करण्यासाठी ते गेले असता पट्टेदार वाघाने सुभाष करारे यांच्यावर झडप घेतली. परंतु मधेच काट्याचे झुडूप असल्याने वाघ त्या काटयाच्या झाडाला अडकला. संधी साधत शेतकऱ्याने पळ काढला. त्यामुळे त्याचे प्राण बचावले. त्यानंतर वाघ तिथेच बसला. त्यानंतर आजुबाजुचा गावातील नागरिक व परिसरातील नागरिक पट्टेदार वाघ बघण्यासाठी एकच गर्दी करू लागले. घटनास्थळी जत्रेचे स्वरुप आले होते.
नेरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करण्यासाठी चिमूर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

वाघ अद्यापही तिथेच
वाघाला बेशुद्ध करून जंगलात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु वनविभागाने ते काही न ऐकता घटनास्थळावर फटाक्याची आतिषबाजी करुन वाघाला जंगलाच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. वृत्त लिहिपर्यंत वाघ घटनास्थळावरच दबा धरून बसला आहे. वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, चिमूरचे उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, तहसीलदार संजय नागटिळक, जि.प.सदस्य गजानन बुटके, पं. स. उपसभापती शांताराम सेलवटकर,आशिफ शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली.
अन् अस्वल जंगलात पळाले
पोंभुर्णा : देवाडा खुर्द येथील डोंगर परिसरामधील आंब्याच्या झाडावर अस्वलाने ठिय्या मांडला होता. ही माहिती मिळताच गावकरी व वनविभागाने अस्वलीला जंगलात पळवून लावल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. देवाडा खुर्द हे गाव जंगल परिसराला लागून आहे. येथून अर्ध्या किमी अंतरावरील वनविभागाच्या कक्ष क्र. ६४९ मधील आंब्याच्या झाडावर अस्वलीने ठिय्या मांडला होता. या अस्वलीच्या दर्शन होताच काही नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. त्यांनी ही घटना ग्रामस्थ, वनविभाग व पोलिसांना सांगितली. क्षेत्र सहाय्यक आर. एस. यादव, ठाणेदार एन. जी. कुकडे, पोलिस उपनिरीक्षक मानदकर व ग्रामस्थांनी झाडावर ठाण मांडलेल्या अस्वलीला पळवून लावण्ण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दरम्यान नागरिकांना माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी उसळली. शर्तीचे प्रयत्न करून या अस्वलीला जंगलात पळविल्याने गावकºयांनी सुटकेचा श्वास टाकला.

Web Title: Wagha's farmer attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.