नागभीड रेल्वे स्थानकावरील शौचालय कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:23 PM2018-05-28T23:23:42+5:302018-05-28T23:23:42+5:30

संपूर्ण देश स्वच्छतेचा जागर करीत आहे. मात्र येथील रेल्वे प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयाला रेल्वे प्रशासनाने कुलूपबंद अवस्थेत ठेवल्यावरून दिसून येते.

Toilets lock at Nagbhid railway station | नागभीड रेल्वे स्थानकावरील शौचालय कुलूपबंद

नागभीड रेल्वे स्थानकावरील शौचालय कुलूपबंद

Next
ठळक मुद्देप्रवाशांना अडचण : शौचालय सार्वजनिक की कर्मचाऱ्यांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : संपूर्ण देश स्वच्छतेचा जागर करीत आहे. मात्र येथील रेल्वे प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयाला रेल्वे प्रशासनाने कुलूपबंद अवस्थेत ठेवल्यावरून दिसून येते.
नागभीड येथे रेल्वेचे इंग्रजकालीन जंक्शन आहे. नागभीड येथून गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी अनेक गाड्या धावतात. या गाड्यांनी दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवाश्यांच्या सोयीसाठी रेल्वेने येथे शौचालयाचे बांधकाम केले आहे. या बांधकामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाने हे शौचालय अद्यापही कुलूपबंदच ठेवले आहे.
शौचालय कुलूपबंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. इतर प्रवाशांना या शौचालयाशी काही देणेघेणे नसले तरी जे प्रवासी नागभीड येथून प्रवासाला प्रारंभ करतात त्यांच्यासाठी येथील शौचालय अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र येथील शौचालय नेहमीच कुलूपबंद राहत असल्याने नागभीड येथून प्रवास करणाºया अनेक प्रवाशांना विधी उरकून घेण्यासाठी एकतर उघड्यावर जावे लागत आहे नाही तर गाडी येण्याची वाट पाहावी लागते.
देशात सर्वत्र स्वच्छतेसाठी शौचालय बांधकामावर भर देण्यात येत आहे. यासाठी हजारो रूपयांचे अनुदानही देण्यात येत आहे. मात्र येथील रेल्वे प्रशासनाने शौचालय कुलूपबंद का ठेवले, हे एक कोडेच आहे.
दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने या शौचालयाविषयी चौकशी केली असता, या शौचालयाची चाबी स्टेशन मास्तरकडे उपलब्ध आहे, असा मजकूर या शौचालयाच्या दर्शनी भागावर लिहून आहे. त्यामुळे या शौचालयाची निर्मिती कर्मचाºयांसाठी करण्यात आली आहे की, सार्वजनिक वापरासाठी हे समजू शकले नाही. दरम्यान यासंदर्भात रेल्वेच्या दुरध्वनी क्रमांकावर अनेकदा संपर्क साधला असता, संपर्क झाला नाही. तरी रेल्वे प्रशासना या शौचालयाचे कुलूप उघडून प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

Web Title: Toilets lock at Nagbhid railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.