नगराध्यक्षपदासाठी तीन अक्षरी नावांवर बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:42 PM2018-08-10T22:42:08+5:302018-08-10T22:42:36+5:30

निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कोणाचा ना कोणाचा वरचष्मा असतो. परंतु भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा तीन अक्षरी नावांचा नगराध्यक्षपदासाठी वरचष्मा असल्याचे पुढे येत आहे. नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या आठ उमेदवारांपैकी प्रत्येक उमेदवाराचे नाव तीन अक्षरी आहे. यातील दोन उमेदवार अपक्ष आहेत.

Three-letter names for the post of City President | नगराध्यक्षपदासाठी तीन अक्षरी नावांवर बाजी

नगराध्यक्षपदासाठी तीन अक्षरी नावांवर बाजी

Next
ठळक मुद्देनगर परिषद निवडणूक : विजयासाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी

सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कोणाचा ना कोणाचा वरचष्मा असतो. परंतु भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा तीन अक्षरी नावांचा नगराध्यक्षपदासाठी वरचष्मा असल्याचे पुढे येत आहे. नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या आठ उमेदवारांपैकी प्रत्येक उमेदवाराचे नाव तीन अक्षरी आहे. यातील दोन उमेदवार अपक्ष आहेत.
नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढणाऱ्या तीन अक्षरी नावांमध्ये अनिल सुनील, विशाल, कुशल, लक्ष्मण, भूपेंद्र, संजय, प्रशांत या नावांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे अनिल धानोरकर, भाजपातर्फे सुनील नामोजवार, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लक्ष्मण बोढाले, बीआरएसपीकडून अ‍ॅड. भूपेंद्र रायपुरे, बहुजन समाज पार्टीतर्फे विशाल बोरकर, भारिप बहुजन महासंघाकडून कुशल मेश्राम आणि अपक्ष म्हणून प्रशांत कारेकर व संजय आसेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे यातील विविध राजकीय पक्षांचे उमेदवार हेच आपआपल्या पक्षातील दिग्गज नेते मानले जातात. अपक्ष उमेदवारांचेही सामाजिक कार्यात योगदान आहे. सर्वच उमेदवार विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. चिन्ह वाटप झाल्याने निवडणूक प्रचाराला सगळेच उमेदवार सज्ज झाले. रिक्षा, आॅटो व चारचाकी वाहनांवर लाऊडस्पीकर बांधून शहरातील प्रत्येक वॉर्ड पिंजून काढत आहेत. त्यामुळे अनेकांना हंगामी रोजगार मिळाला. शहरातील मंगल कार्यालय, डेकोरेशन व कॅटरर्स व्यवसायातील आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवारही यंदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
कार्यकर्त्यांसाठी जेवणावळींवर जोर
आयुधनिर्माणी (भद्रावती) : पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर अनेकांना आता नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे डोहाळे लागले. यावेळी आपणच सत्ता काबीज केली पाहिजे, या भावनेतून काही कार्यकर्ते व मतदार जेवणावळींचे आयोजन करण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक स्वयंघोषित नगरसेवक उमेदवारीच्या कामी लागले होते. आपल्यालाच यावेळी उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी पक्षनेतृत्वाकडे अनेकांनी फिल्डिंगही लावली होती.

Web Title: Three-letter names for the post of City President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.