चंद्रपुरातील सव्वालाख बालकांना गोवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:08 PM2018-08-11T22:08:14+5:302018-08-11T22:08:42+5:30

महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवर व रुबेला रोगांसंबंधी जागृती व लसीकरण मोहिमेला गुरूवारपासून सुरू करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सव्वालाख बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.

Swavakala children in Chandrapur | चंद्रपुरातील सव्वालाख बालकांना गोवर लसीकरण

चंद्रपुरातील सव्वालाख बालकांना गोवर लसीकरण

Next
ठळक मुद्देमनपाची मोहीम : प्रत्येक वॉर्डात शिबिरांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवर व रुबेला रोगांसंबंधी जागृती व लसीकरण मोहिमेला गुरूवारपासून सुरू करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सव्वालाख बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.
महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. रूबेला लसीकरण मोहीम देशभरात सुरू झाली आहे. २०२० पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला नियंत्रण करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. यात देशभरातील ४१ कोटी बालकांचे लसीकरण नोव्हेंबरमध्ये करण्याचे उद्दिष्ठ पुढे ठेवण्यात आले. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या दोन आठवड्यांत शाळांमधील मुला व मुलींना लस देण्यात येणार आहे. शाळेत न जाणाºया मुलांचे लसीकरण तर शेवटच्या आठवड्यात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांकडे लक्ष केंद्रीत केले जाईल. ही लस गोवर व रूबेला या संसर्गजन्य रोगांवर प्रभावी व दीर्घकाळ रोगप्रतिकार शक्ती देणारी आहे. गोवर गोवरच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते, अशी माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी यावेळी दिली. शहरातील बालकांच्या आरोग्यासाठी विविध योजना तयार करून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले. मान्यवरांनीही मनपाच्या उपक्रमांवर चर्चा केली. याप्रसंगी गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, उपसंचालक कार्यालय एसएमओ डॉ. साजिद, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मेश्राम, डॉ. नितीन कापसे, विविध स्वयंसेवी संस्था शाळांचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

मातांनी घ्यावी काळजी
जगात दरवर्षी ५० हजार मृत्यू गोवर रोगामुळे होतात. त्यातील ४० टक्के भारतात होत आहेत. १९९५ पासून पोलिओ निर्मूलनाची मोहीम सुरु झाली. त्याचप्रमाणे गोवर व रुबेला निर्मूलनासाठी कार्य सुरु झाले आहे. चंद्रपूर शहरातील मातांनी आपले बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे यांनी दिली.
लसीकरणाचे फ ायदे
लसीकरणामुळे बालमृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे. भारत पोलिओमुक्त झाला आहे. याआधी गोवर लस देण्यात येत होती. परंतु आता गोवर व रुबेला दोन्ही रोगांकरिता एकच लस देण्यात येणार आहे. शासनाकडून आरोग्यासाठी भरपूर निधी देण्यात आला. लसीकरण हा त्याचाच एक भाग आहे. चंद्रपुरात शाळानिहाय केले जाणार आहे. त्यामुळे एकही बालक सुटता कामा नये याची काळजी घेण्यात येत आहे. पालकांमध्ये जागरूकता सुरू असून मातांना विशेष लक्ष दिले पाहिजे, असेही महापौर अंजली घोटेकर याप्रसंगी म्हणाल्या. कुटुंबातील एक बालक जर पीडित असेल तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. शहरात एकही बालक गोवर व रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी समाजातील सर्वांनी सहकार्य करावे, असेही महापौर घोटेकर यांनी मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी नमुद केले.

Web Title: Swavakala children in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.