गाव वाचविण्यासाठी प्रेमनगरातील नागरिकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:57 PM2017-12-12T23:57:46+5:302017-12-12T23:58:22+5:30

गावात मूलभूत सोईसुविधांचा अभाव असताना केवळ शेतीच्या आधारावर जगण्यासाठी सेवादासनगर येथून स्थलांतरित होऊन शेतीलगतच प्रेमनगर नावाची वस्ती तयार केली.

Struggling to save the village | गाव वाचविण्यासाठी प्रेमनगरातील नागरिकांची धडपड

गाव वाचविण्यासाठी प्रेमनगरातील नागरिकांची धडपड

Next

शंकर चव्हाण।
आॅनलाईन लोकमत
जिवती : गावात मूलभूत सोईसुविधांचा अभाव असताना केवळ शेतीच्या आधारावर जगण्यासाठी सेवादासनगर येथून स्थलांतरित होऊन शेतीलगतच प्रेमनगर नावाची वस्ती तयार केली. परंतु, तेलंगणा राज्यातील कोलामा येथील नागरिकांनी गाव सोडण्याची धमकी दिल्याने ही वस्ती दहशतीत आहेत. शासनाने हा प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी अन्यायग्रस्तांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. सोमवारी प्रेमनगराला भेट दिल्यानंतर दहशतीमध्ये वावरणाºया नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
नोकेवाडा ग्रामपंचायतीमध्ये येणाºया सेवादास नगरातील काही शेतकºयांची शेती तेलंगणा राज्यातील कोलामा गावाजवळ आहे. मागील ३५ ते ४० वर्षांपासून हे ग्रामस्थ सेवादास नगरातूनच ये-जा करीत शेती करायचे. पण, शेतीचे अंतर खूप लांब आहे. पावसाळ्यात त्यांना ये-जा करण्यासाठी त्रास होऊ लागल्याने दहा वर्षांपूर्वी स्वत:च्या शेतालगत म्हणजे तेलंगणा राज्यातील कोलामा गावापासून चार किमी अंतरावर १६ घरांची वस्ती थाटली. सर्व कुटुंबे आता शेतीच्या आधारावर संसाराचा गाडा चालवित आहेत. हे गाव तेलंगणा सीमेवर असले, तरी अजुनही येथील नागरिकांची नावे महाराष्ट्राच्या मतदार यादीत आहेत. नोकेवाडा ग्रामपंचायतीमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. येथील काही नागरिकांनी हळूहळू तेलंगणा राज्यातही आपले नाव मतदान यादीत समाविष्ट केले. काही शेतकºयांना तेलंगणा सरकारकडून शेतीची मालकी हक्क दिल्याचे समजते. महिनाभरापासून तेलंगणा व आंध्र प्रदेशात असलेले आदिवासी आणि बंजारा समाजामध्ये आरक्षण प्रश्नावरून वाद चिघळत आहे. बंजारा समाज हा तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याने विकास योजनांचा फायदा घेतात. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून वगळावे आणि अनुसुचित जमातीचा लाभ फक्त आदिवासींनाच द्यावी, अशी मागणी करून आदिवासी बांधवानी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, सोमवारी प्रेमनगर गावात जावून चक्क गाव उठविण्याची धमकी दिल्याने हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
सोनेराव पाटील असते तर...
प्रेमनगर वस्ती बसविण्यासाठी कोलामा येथील गावपाटील सोनेराव जुमनाके यांनी पुढाकार घेतला होता. एक वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. ते हयात असते तर हा प्रकार घडला नसता, अशी प्रतिक्रिया प्रभु जाधव यांनी दिली.
वणी पोलीस गावात दाखल
प्रेमनगरातील नागरिकांना कोलामा येथील ग्रामस्थांनी गाव सोडण्याची धमकी दिल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच जीवती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया वणी पोलीस कॅम्पचे पोलीस उपनिरीक्षक दराटे आणि पथक सोमवारी गावात दाखल झाले. कोलामा येथील आदिवासींशी चर्चा केली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
हैदराबाद येथे आज बंजारा समाजाचा मोर्चा
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत प्रवर्गात ठेवा, या मागणीसाठी बुधवारी हैदराबाद येथे बंजारा समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यात १४ गावांतील नागरिक सहभागी होणार.
समस्या जैसे-थे
सेवादास नगरातून स्थलांतरित होऊन नवीन वस्ती थाटलेल्या प्रेमनगरात अनेक समस्या कायम आहेत. नोकेवाडा ग्रामपंचायतीने सिमेंट रस्ता बांधून दिला. मात्र समस्या कायम आहेत.

Web Title: Struggling to save the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.