पेसा गावात तेंदू संकलन सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:57 AM2019-05-01T00:57:31+5:302019-05-01T00:57:58+5:30

कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रातील पेसा अंतर्गत येणाऱ्या सात गावांतील तेंदू संकलन केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु करणाºया समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Start collecting tendu in Pisa village | पेसा गावात तेंदू संकलन सुरू करावे

पेसा गावात तेंदू संकलन सुरू करावे

Next
ठळक मुद्देशेतकरी संघटना : मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रातील पेसा अंतर्गत येणाऱ्या सात गावांतील तेंदू संकलन केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु करणाºया समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रातील पार्डी, परसोडा, कोठोडा, लांबोरी, दुगार्डी, मांगलहिरा, मांडवा ही सात गावे पेसा अंतर्गत येतात. या गावांत अद्यापही तेंदूपत्ता संकलनाचे केंद्र सुरु झालेले नाही. या गावांत तेंदूपाने संकलन केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांची एक समिती याविषयी मंजूरी प्रदान करते. परंतु अन्यत्र तेंदूपाने संकलन केंद्र सुरु झाले असतानाही अद्याप या भागात संकलन केंद्र मंजूर करण्याची कार्यवाही झाली नाही. यामुळे या सातही गावातील मजुरांना काम उपलब्ध नसल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या तेंदू संकलन करणाºया कुटूंबांना केंद्र सुरु न झाल्याने ही वेळ निघुन जाते की, काय अशी भिती सतावत आहे. संकलनाचा वेळ निघुन गेल्यास तेंदूपाने मिळणे कठिण जाते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी अ‍ॅड. वामनराव चटप यांच्याकडे आपली समस्या मांडली. याविषयी दखल घेऊन निर्णय घेणाºया समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी, वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक आणि वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना पत्र लिहून तातडीने समितीची बैठक घेऊन संकलन केंद्र सुरु करण्याची करण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार अ‍ॅड. चटप, प्रभाकर दिवे, अरुण नवले, अनिल ठाकुरवार, श्रीनिवास मुसळे, निळकंठ कोरांगे, जोत्स्ना मोहितकर, पोर्णिमा निरंजने, बंडू राजुरकर, रवींद्र गोखरे, अविनाश मुसळे, अनंता गोडे, भुमन्ना चुकाबोटलावार, संजय येरमे, बाबाराव खडसे, विनोद तुमराम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Start collecting tendu in Pisa village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल