सराईत चोरट्या महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:41 PM2018-04-18T23:41:46+5:302018-04-18T23:41:46+5:30

गर्दीचा फायदा घेत महिलांची पर्स आणि मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली. तिच्या जवळून चोरीतील १२ मोबाईल आणि चार लेडीज हँन्ड पर्स हस्तगत करण्यात आल्या आहे. बिसमील्ला शेख कयुम शेख (५०) रा. ताडबन असे चोरटया महिलेचे नाव आहे.

Saraiat thieves arrested the woman | सराईत चोरट्या महिलेला अटक

सराईत चोरट्या महिलेला अटक

Next
ठळक मुद्देगुन्हे शोध पथकाची कारवाई : १२ मोबाईल, चार पर्स जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गर्दीचा फायदा घेत महिलांची पर्स आणि मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली. तिच्या जवळून चोरीतील १२ मोबाईल आणि चार लेडीज हँन्ड पर्स हस्तगत करण्यात आल्या आहे. बिसमील्ला शेख कयुम शेख (५०) रा. ताडबन असे चोरटया महिलेचे नाव आहे.
मागील काही दिवसांपासून महिलांच्या पर्स चोरी गेल्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशीच एक घटना शनिवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कपडयाच्या दुकानात घडली होती. या प्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आधारे शहर पोलिसांनी सदर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी करणारी महिला पोलिसांना दिसून आली. त्या आधारे सापळा रचून शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने या महिलेला अटक केली आहे. तिने चोरीची कबुली दिली असून तिच्या जवळून विविध ठिकाणाहून चोरण्यात आलेल्या चार लेडीज पर्स व महागडे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शहर ठाण्याचे ठाणेदार एस.एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस उपनिरिक्षक एस. मुंडे, सहायक फौजदार प्रभुदास माऊलीकर, अतुल दौड, सुरेश केमेकर, दिलीप चौधरी, चंद्रहासकर जीवतोडे, बंदीरात पाल, स्वामीदास चालेकर, संजय आतकुलवार, किशोर तुमराम, किशोर वैरागडे, प्रकाश बल्की, पांडुरंग वाघमारे आदींनी केली असून या घटनेचा पुढील तपास सुरेश केमेकर करीत आहे.

Web Title: Saraiat thieves arrested the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.