आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:12 AM2018-04-20T00:12:36+5:302018-04-20T00:12:36+5:30

शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराची रक्कम आधारसंलग्न बँक खात्यात थेट टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाविरुद्ध चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला कुलूप ठोकून विकास प्रकल्प कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.

Project of tribal students stuck in the office | आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयात ठिय्या

आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयात ठिय्या

Next
ठळक मुद्देआहाराची जाचक अट रद्द करा : वसतिगृहाला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराची रक्कम आधारसंलग्न बँक खात्यात थेट टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाविरुद्ध चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला कुलूप ठोकून विकास प्रकल्प कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली असून सात दिवसांपासून वसतिगृहाला कुलूप ठोकल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी दैनंदिन मेनूप्रमाणे भोजन दिले जात होते. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा होता मात्र कोणतेही कारण नसताना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने जुनी अट रद्द करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आहाराची रक्कम जमा करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सोयीचा नसून आर्थिक गैरव्यवहाराला चालणा देणारा आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय रद्द केला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यालयास कुलूप ठोकले.
सरकारकडून आदिवासी विद्यार्थ्यांची दिशाभूल
शासकीय आदिवासी वसतिगृहात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत रक्कम बँक खात्यात अद्याप टाकण्यात आली नाही. निर्वाह भत्ता आणि डी. बी. टी. अद्याप मिळाली नाही. आदिवासी वसतिगृहातील सुविधांमध्ये वाढ न करता चुकीचे निर्णय घेऊन सरकार दिशाभूल करीत आहे, असा आरोप शेकडो संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलानादरम्यान केला आहे.

Web Title: Project of tribal students stuck in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.