कर्जमाफीसाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:59 PM2017-09-02T23:59:55+5:302017-09-03T00:00:32+5:30

एकीकडे शासन डिजीटल इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता मारत असताना महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात इंटरनेटची गंभीर समस्या आहे.

Payday loan | कर्जमाफीसाठी पायपीट

कर्जमाफीसाठी पायपीट

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाभर हीच स्थिती : जिवती तालुक्यातील शेतकºयांची गडचांदूरकडे धाव

आशिष देरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : एकीकडे शासन डिजीटल इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता मारत असताना महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात इंटरनेटची गंभीर समस्या आहे. अशातच राज्य सरकारने शेतकºयांची कर्जमाफी केल्याची घोषणा केली. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्याची अट ठेवल्याने दुर्गम भागातील शेतकºयांना इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरण्यासाठी ४० ते ५० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जिवती व कोरपना तालुक्यातील या गंभीर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे.
कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शासनाने १५ सप्टेंबर २०१७ ही अंतिम तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकºयांची गडचांदूर येथील इंटरनेट कॅफेमध्ये रिघ लागली आहे. लिंक नसल्यामुळे वेबसाईट दिवसभर बंद असते. अशावेळी ताटकळत वाट बघण्यापेक्षा गावाकडे जाऊन पुन्हा दुसºया दिवशी परत यावे लागते. शेतकºयांना कॅफेमध्ये आपला नंबर लावायचा झाल्यास सकाळचे जेवण न करता पहाटेच वाहन पकडून गडचांदूर गाठावे लागते. जिवती तालुक्यातील तेलंगाना सीमेवरील शेतकरी रोज ये-जा करीत आहे. मात्र वाट बघूनही अर्ज न भरल्याने त्यांना फार मानसिक त्रास होत आहे. शासनाच्या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या भानगडीत अनेक शेतकरी कर्जमाफीचा अर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.
महिला शेतकºयांचीही गर्दी
ज्यांच्या नावाने शेतजमीन आहे, त्यांनाच अर्ज भरता येतो. सातबारा ज्यांच्या नावे आहे, त्यांचा अंगठ्याचा ठसा आॅनलाईन घेतल्याशिवाय अर्ज अधिकृत होत नाही. कारण शेतकºयाची खरी माहिती पटावी, यासाठी आधार लिंक असल्याने बोटाचा ठसा महत्वाचा झाला आहे. शेतजमीन नावावर असणाºया अनेक शेतकरी महिलासुद्धा आहे. त्यामुळे महिलांना घरकामे सोडून दोन-तीन दिवस पूर्णवेळ खर्च करावे लागत आहे.

आमच्या जिवती तालुक्यात इंटरनेट बरोबर नसल्याने मी गडचांदूरला येऊन अर्ज भरीत आहो. सर्व कागदपत्रे घेऊन वाट बघत आहो. पण नंबरच लागत नाही. पुढच्या शेतकºयाला विचारल्यास लिंक नाही म्हणून सांगण्यात येते. असे करता-करता पाच दिवस झाले. पण अजूनही अर्ज भरला नाही. कामधंदे सोडून ४५ किलोमीटर दुरून आल्यानंतर काम होत नाही.
- अंगद शिवराज ठोंबरे, नारपठार

याअगोदर पण कर्जमाफी झाली होती. तेव्हा आम्ही बँकेत न जाता बँकेचे कर्मचारी आमच्या घरी यायचे आणि अर्ज भरायचे. मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे. आता आमचा त्रास वाढला आहे. शेतातील कामे सोडून आम्ही रोज अर्ज भरायला येत आहो. तरी पण अर्ज भरल्या जात नाही आहे. काय करावे काहीच समजत नाही.
-पांडुरंग साधू सूर्यवंशी,
मरकलमेटा

जनतेला रांगेत उभे करण्याचे धोरण
ज्याप्रमाणे नोटाबंदी करून मोदी सरकारने देशातील जनतेला रांगेत उभे केले. तसेच फसवी कर्जमाफी करून राज्यातील फडणवीस सरकारने गरीब शेतकºयांना रांगेत उभे केले. जनतेला रांगेत उभे करून त्रास देण्याचे भाजपा सरकारचे धोरण आहे. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी अजूनही इंटरनेट पोहचले नसल्याने शेतकरी आॅनलाईन अर्ज भरू शकले नाहीे. शेतातली कामे सोडून ४-५ दिवस शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी रांगेत राहावे लागत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. कोणतीही अट न ठेवता शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी.
- सुभाष धोटे, माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस, कॉंग्रेस

Web Title: Payday loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.