शहीद सुनीलवर दुर्गापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Published: May 12, 2014 11:27 PM2014-05-12T23:27:19+5:302014-05-12T23:27:19+5:30

दुर्गापूर वॉर्ड क्र. १ येथील रहिवासी सुनील मडावी (३२) नक्षल शोध मोहीम राबवून परत येत असताना येडानूर जंगल परिसरात नक्षल्यांच्या भूसुरुंग स्फोटात रविवारी गडचिरोलीत शहीद झाला.

The official funeral of the martyr Sunil Durgapur | शहीद सुनीलवर दुर्गापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद सुनीलवर दुर्गापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next

दुर्गापूर : दुर्गापूर वॉर्ड क्र. १ येथील रहिवासी सुनील मडावी (३२) नक्षल शोध मोहीम राबवून परत येत असताना येडानूर जंगल परिसरात नक्षल्यांच्या भूसुरुंग स्फोटात रविवारी गडचिरोलीत शहीद झाला. त्याचे पार्थिव सोमवारी दुर्गापुरात आणण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात व अंत्यत शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वडिलाच्या विरोधाला बगल देत देशसेवेचे व्रत उराशी बाळगून सुनिल तुकडू मडावी ७ जुलै २00६ रोजी पोलिसात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची गडचिरोली येथील नक्षल विरोधी विशेष अभियान पथकात नियुक्ती करण्यात आली. आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडीत असताना काळाने त्याच्यावर झेप घेतली.

दोन दिवस नक्षल शोध मोहीम राबवून गडचिरोलीत परत येत असताना नक्षल्यांनी भूसुरंग स्फोट घडवून आणला. यात इतर जवानांसह सुनील शहीद झाला. दुर्गापुरात ही घटना माहीत होताच सर्वत्र शोककळा पसरली. लगेच त्याच्या कुटुंबीयांनी गडचिरोली गाठली. सोमवारी ११.४५ वाजता त्याचे पार्थिव दुर्गापुरातील त्याच्या राहत्या घरी आणण्यात आले. ख्रिश्‍चन विधीनुसार प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर आर.सी.बी.च्या जवानांनी साधी सलामी दिली. नंतर अंत्ययात्रेला प्रारंभ झाला.

पोलिसांच्या उपस्थितीत पोलीस वाहनाने अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा तुकूम येथील ख्रिश्‍चन स्मशानभूमीत आल्यानंतर पोलीस अधीक्षक राजीव जैन, पोलीस उपअधीक्षक राजु भुजबळ यांच्या उपस्थितीत बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलिसांनी सलामी दिली. ख्रिश्‍चन निधीनुसार अंत्यत शोकाकूल वातावरणात सरकारी इतमामात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील अविवाहित होता. त्याच्या लग्नाकरिता स्थळ शोधणे सुरू असताना काळाने घात केला. (वार्ताहर)

Web Title: The official funeral of the martyr Sunil Durgapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.