लालसर छातीची फटाकडी पक्ष्याची विदर्भात प्रथमच नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:54 PM2017-07-26T17:54:06+5:302017-07-26T18:01:53+5:30

दुर्मिळ असणारा आणि क्वचितच आढळणारा लाल फटाकडी पक्षी विदर्भात प्रथमच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आढळला.

New bird found in Tadoba forest | लालसर छातीची फटाकडी पक्ष्याची विदर्भात प्रथमच नोंद

लालसर छातीची फटाकडी पक्ष्याची विदर्भात प्रथमच नोंद

googlenewsNext
ठळक मुद्देपाणवनस्पतीमध्ये वास्तव्यताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळला

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : दुर्मिळ असणारा आणि क्वचितच आढळणारा लाल फटाकडी पक्षी विदर्भात प्रथमच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आढळला.
सदर लालसर छातीची फटाकडी अशी मराठीत नोंद असलेला हा पक्षी ताडोबाच्या बफर पर्यटन क्षेत्रात येणाºया कालापाणी इरई धरण्याच्या बॅक वॉटर असलेल्या वनक्षेत्रात जून महिन्यात पर्यटन सफारी दरम्यान आढळला. यावेळी वन्यजीव छायाचित्रकार असलेले राहुल कुचनकर यांनी सदर पक्षांचे फोटो घेतले. त्यावेळेस सदर पक्षाबाबत अधिक माहिती मिळू शकली नव्हती.
राहुल कुचनकर यांनी या पक्षाबाबत इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांना माहिती दिली असता त्यांनी महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संघटनेचे सरकार्यवाह डॉ. जयंत वडतकर यांना सदर पक्षाचे फोटो पाठविले होते. डॉ जयंत वडतकर यांनी या पक्षाचे नाव ‘रूड्डी ब्रेस्टेड क्रेक’ असे असून शास्त्रीय नाव ‘पोजार्ना फयुस्का’ असे आहे. मराठीमध्ये याची ओळख लालसर छातीची फटाकडी अशी असून या गटातील सर्वच प्रजाती या दलदलीच्या काठाने बेशरमसारख्या पाणवनस्पती मध्ये वावरतात. त्यामुळे सहजासहजी दिसून येत नाहीत. ताडोबा बफर वनक्षेत्रातील ही नोंद म्हणजे विदर्भातील पहिलीच नोंद ठरली आहे, अशी माहीती दिली आहे.
सदर लालसर छातीची फटाकडी या पक्षांचे वर्णन पुस्तकात पोट, कुस आणि शेपटीखाली पांढरे पट्टे, माथ्याखाली आणि मानेखाली तपकिरी वर्ण असतो. सदर पक्षी स्थानिक स्थलांतर करणारा, पश्चिम घाट मुंबई पासून दक्षिणेकडे केरळपर्यत तसेच श्रीलंका येथे आढळतो. प्रामुख्याने दलदलीच्या पाणस्थळी सदर पक्षी आढळतो. विदर्भात प्रथमच या पक्षांची नोंद झाल्याने सदर बातमी पक्षिमित्रांना सुखावणारी बातमी आहे.

Web Title: New bird found in Tadoba forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.