महापुरूषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:42 AM2019-07-12T00:42:06+5:302019-07-12T00:43:40+5:30

शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले.

The need for inspiration from the lives of great men | महापुरूषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची गरज

महापुरूषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देहेमंत देशमुख : ऊर्जानगरात गोंडीयन समाजाचा प्रबोधन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्माण होईल, असे प्रतिपादन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले. उर्जानगरातील स्नेहबंध सभागृहात गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वीरांगना महाराणी दुर्गावती शहिद दिनानिमित्त सत्कार व मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक बी. डी. मडावी, महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, प्रबोधकार दिलीप सोळंके, लोकश मडावी, गोंडराजे विरेंद्र्रशाह आत्राम, सुनील गावडे, मनोज आत्राम, स्मिता कोवे, चंद्रशेखर सेडमाके, वानखेडे, प्राचार्य डॉ. विजय खंडाते व गोंडीयन आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या काळात पारंपरिक शिक्षण न घेता आधुनिक कौशल्य शिक्षण घेतले पाहिजे. वैयक्तिक क्षमतांचा विकास करून येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार व्हावे, असे विचार दिलीप सोळंके यांनी मांडले.
अर्चना खंडाते यांना राणी हिराई सामाजिक पुरस्कार व महादेव देवाजी मडावी यांना गोंडवाना भूषण पुरस्काराने व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. सुधाकर मडावी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी व माऊंट एव्हरेस्ट सर करणाºया शूर गिर्यारोहकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. खासदार बाळू धानोरकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मुख्य अभियंता राजु घुगे म्हणाले, आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. परंतु, जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचन वाढवावे. विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. यश मिळविण्यासाठी हाच एक पर्याय आहे. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संघटनेच्या विविध उपक्रमांची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.
गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. लोकश मडावी, गोंडराजे विरेंद्रशाह आत्राम सुनील गावडे, मनोज आत्राम, स्मिता कोवे, चंद्रशेखर सेडमाके, वानखेडे प्राचार्य डॉ. खंडाते यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन रमेश कुंभरे, प्रास्ताविक, सुधाकर कन्नाके यांनी केले. सुनिल तलांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विजय तोडासे, ज्योती रावन गावडे राजेंद्र किन्नाके, प्रमोद इरपाते, प्रमोद कोवे, राजु कुंभरे, माणिक परचाके, रविंद्र पुसाम, बंडू कुळमेथे, सुभाष कोवे, प्रा धीरज शेडमाके, सुनील तलांडे, संजय तोडासे, निलेश कुमरे, अमृत आत्राम, दिनेश कुमरे, सारंग कुंभर, विद्यार्थी व गोंडीयन समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: The need for inspiration from the lives of great men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.