राष्ट्रीय चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:56 PM2018-09-05T22:56:05+5:302018-09-05T22:56:28+5:30

ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पूरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे, अशा शिक्षकांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करुन चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बुधवारी कर्मवीर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

The need to impart national characteristic education | राष्ट्रीय चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याची गरज

राष्ट्रीय चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याची गरज

Next
ठळक मुद्देदेवराव भोंगळे : जिल्ह्यातील १६ आदर्श शिक्षकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पूरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे, अशा शिक्षकांनी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करुन चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बुधवारी कर्मवीर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी दिलीप पायपरे, हेमंत वाग्दरकर, दीपलक्ष्मी म. कापकर, अर्चना नवघडे, जिवनदास डोंगरे, गजेंद्र जवंजाळ, प्रमोद तुपट, विठ्ठल वनसिंगे, कमलेश सावसाकडे, गंगाधर गायकवाड, अरूण झगडकर, प्रमिला डाहुले, वैशाली तुम्मे, विष्णु बडे, चंदा धारणे, नरेश बोभाटे या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पूरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य पृथ्वीराज अवताडे, रणजित सोयाम, गोपाळा दडमल, नितू चौधरी, रोशनी खान, कल्पना पेचे, योगीता डबले, मेघा नलगे, जे.डी.पोटे आदी उपस्थित होते.
शिक्षकांनी आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा नाव कसा पुढे येईल यावर लक्ष देऊन शिक्षण दिले पाहिजे, असेही देवराव भोंगळे म्हणाले.शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल झालेला असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले गुण देण्यासाठी सतत प्रयत्न करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी पाठविलेले शुभेच्छा संदेशही वाचून दाखविण्यात आल्या.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे यांनी तर संचालन विस्तार अधिकारी अर्पण माशीरकर यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (प्राथमिक) अरुण काकडे यांनी केले. यावेळी मोठया संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता.

Web Title: The need to impart national characteristic education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.