चिमुरात अंगणवाडी सेविकांचा जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:20 PM2017-10-05T23:20:00+5:302017-10-05T23:20:16+5:30

मागील महिन्यापासून मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य शासनाने संपाची दखल घेत अंगणवाडी सेविकांनी मानधात तुटपुंजी वाढ करण्याचा निर्णय घेतला.

Jailbreak of Anganwadi Sevikas in Chimur | चिमुरात अंगणवाडी सेविकांचा जेलभरो

चिमुरात अंगणवाडी सेविकांचा जेलभरो

Next
ठळक मुद्देशासनाने आता तरी दखल घ्यावी : अंगणवाडी केंद्र महिनाभरापासून बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मागील महिन्यापासून मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य शासनाने संपाची दखल घेत अंगणवाडी सेविकांनी मानधात तुटपुंजी वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यातील अंगणवाडी सेविकांनी ही वाढ न स्वीकारता आदोलन आणखी तीव्र केले आहे. चिमूर, वरोरा, भद्रावती, ब्रम्हपूरी, नागभिड, सिंदेवाही सह सर्वच तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी दुपारी चिमूर तहसील कार्यालयावर धडक देत जेलभरो आंदोलन केले. यात शेकडो अंगणवाडी सेविकांना अटक व सुटका करण्यात आली.
सहा वर्षाच्या बाळापासून तर गरोदर मातांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करीत आहेत. समाजाला व देशाला सुदृढ करण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडून करवून घेण्यात येते. मात्र त्याबदल्यात तुटपुंजे मानधन देण्यात येते. अल्पशा मानधनामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना आर्थीक टंचाईचा सामना करावा लागत आहे. मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी अनेक वर्षापासून निवेदने, धरणे, आंदोलने करीत आहेत. मात्र शासनाने दखल घेतलेली नाही.
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यभरातील अंगणवाडी केंद्र बंद अवस्थेत असल्यामूळे ग्रामीण भागातील गरोदर माता बालकांना सकस आहरापासून वंचित राहावे लागत आहे. मात्र प्रशासनाला मागण्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून जेलभरो आंदोलन करीत शासनाला जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात चिमुर तालुक्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता. राज्याध्यक्ष ईकलाखभाई कुरेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

Web Title: Jailbreak of Anganwadi Sevikas in Chimur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.