जिल्ह्यात गुन्हे निम्म्यावर

By admin | Published: January 4, 2017 12:56 AM2017-01-04T00:56:28+5:302017-01-04T00:56:28+5:30

यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याच्या क्राईम रेकॉर्डमध्ये सुधारणा झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०१६ मधील गुन्हे हे अगदी निम्म्यावर आणण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे.

Half of the defendants in the district | जिल्ह्यात गुन्हे निम्म्यावर

जिल्ह्यात गुन्हे निम्म्यावर

Next

संदीप दिवान : क्राईम रेकॉर्डमध्ये सुधारणा
चंद्रपूर : यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याच्या क्राईम रेकॉर्डमध्ये सुधारणा झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०१६ मधील गुन्हे हे अगदी निम्म्यावर आणण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. वेळोवेळी प्रोअ‍ॅक्टीव्ह पोलिसिंग (सकारात्मक) राबवून गुन्ह्याचा प्रारंभ होण्याच्या कारणांवर आघात करीत पोलिसांनी अनेक मोठ्या गुन्ह्यांना आळा घातला. त्यामुळे शरीराविरुद्ध गुन्हे, मालाविरुद्ध गुन्हे आणि रस्ता अपघाताचे गुन्हे कमी झाले आहेत, असा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दीवान यांनी मंगळवारी आयोजीत पत्रकार परिषदेत केला आहे.
सायबर सेलच्या सभागृहात पत्रकारांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक दिवान म्हणाले, सन २०१५ मध्ये तीन हजार ५९१ आणि चालू वर्षी २०१६ मध्ये तीन हजार १७१ गुन्ह्यांची नोंद आहे. उघडकीचे प्रमाण ८१ टक्के आहे. सन २०१६ मध्ये सन २०१५ च्या तुलनेत (४२०) गुन्ह्यांने घट झालेली आहे. सदर घट ही विशेषत: तीन दरोडा, नऊ जबरी गुन्हे, ५१ चोरी, चार दंगा, ७९ दुखापत, ३६ बलात्कार, ६२ विनयभंग आणि १३५ अपघात याप्रमाणे गुन्ह्यांची घट झालेली आहे. याशिवाय अदखलपात्र प्रकरणात सुद्धा गुन्ह्यांची घट आहे.
विशेषत: दारूबंदी सदराखाली एक हजार ४५३ आणि इतर एक हजार ५२१ आहे. रस्ता अपघात टाळण्याच्या दृष्टीकोणातून एकूण पाच हजार ५३७ लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आल्या. सदर कारवाई मागील वर्षीच्या तुलनेत ३८६ ने जास्त आहे.
महिलांच्या गुन्ह्यांमध्ये विशेषत: चार हुंडाबळी, विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यामध्ये ११ घटना, विवाहितेस सासर मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ ७३ गुन्ह्यांची घट झाली आहे.
याशिवाय अनेक मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये बहुचर्चित जोगी हत्याकांड, ब्रह्मपुरी येथील बलात्कार व खून प्रकरण, पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे एका समारंभातून अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील बनावट लुटमार, दुर्गापूर येथील दरोडा प्रकरण, सावली व बल्लारशहा येथील अल्पवयीन बालकांचे अपहरण प्रकरण अत्यंत शिताफिने उघडकिस आणण्यात आले. त्याचप्रमाणे ताडोबा येथील राष्ट्रीय उद्यानामधील जनावरांची शिकार करून त्यांच्या कातड्याची तस्करी करणारी टोळी पकडण्यात आली.
याशिवाय मोठे छापे घालून अवैध दारू सोबतच राजुरा येथील ११० किलो गांजा, १५२ हरविलेल्या मोबाईलचा शोध, मोहीम मुस्कानतंर्गत ११३ हरविलेल्या मुले-मुली, स्त्री-पुरुष यांचा शोध घेण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. यामधीलच एक उत्कृष्ट कामगिरी म्हणजे तब्बल २२ वर्ष आपल्या आई-वडीलांपासून दुरावलेली मुलगी शोधण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे.
चंद्रपूर पोलिसांनी जनतेचा सहभाग करून घेण्याकरिता अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये ‘से-नो-टू’ ही मोहीम जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयात राबविण्यात आली. तसेच युवा जागरण मेळावा, वृक्ष दिंडी व लागवडीस प्रोत्साहन, पोलीस पाटील मेळावा, अंधश्रद्धा निर्मूलन, संविधान पुस्तिका वाटप, युपीएससी मार्गदर्शन कार्यक्रम, समर कॅम्प, प्राचार्य सभा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले.अशी माहिती अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Half of the defendants in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.