विद्यार्थी केंद्रित अध्यापनाला महत्त्व द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:01 PM2019-02-14T23:01:41+5:302019-02-14T23:03:51+5:30

इंग्रजीच्या अध्यापनात ज्ञानरचनावादाचे महत्त्व लक्षात ठेवावे. बदलत्या काळानुसार विद्यार्थी केंद्रिंत अध्यापनावर भर द्यावे. प्रभावी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून सुलभ अध्यापनाची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नागपुरातील इंग्रजी विषय तज्ज्ञ शुभ्रा राय यांनी केले.

Give students focused teaching importance | विद्यार्थी केंद्रित अध्यापनाला महत्त्व द्यावे

विद्यार्थी केंद्रित अध्यापनाला महत्त्व द्यावे

Next
ठळक मुद्देशुभ्रा राय : जिल्हा शैक्षणिक विकास संस्थेत इंग्रजीवर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: इंग्रजीच्या अध्यापनात ज्ञानरचनावादाचे महत्त्व लक्षात ठेवावे. बदलत्या काळानुसार विद्यार्थी केंद्रिंत अध्यापनावर भर द्यावे. प्रभावी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून सुलभ अध्यापनाची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नागपुरातील इंग्रजी विषय तज्ज्ञ शुभ्रा राय यांनी केले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्थेद्वारा सेंट मायकेल विद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या इंग्रजी विषय शिक्षकांचे जिल्हास्तरीय चर्चासत्रात त्या बोलत होत्या. चेस प्रकल्पाअंतर्गत कार्यरत १५ तालुक्यातील शिक्षकांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.
अध्यक्षस्थानी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटीत तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गंगाधर वाळले, डॉ. धनंजय चाफले, निरीक्षक अनिल पेटकर, सुधीर सिंग उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी कवी वामन पंडितांच्या काव्याचा दाखला देत ज्ञानग्रहणाकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे. स्वत: ला गुणसंपन्न करावे, असेही नमूद केले. चर्चासत्रात निवडक शिक्षकांना इंग्रजी भाषिक कौशल्यावर आधारित पोस्टर सादरीकरणाची संधी देण्यात आली.पोस्टर सादरीकरणातील विजेते शिरीष दडमल, नंदकिशोर चिरटकर, गिरीश कडूकर, शमाकांत पिंपळकर, उमेश राठोड जिवती, सतीश अवताडे यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर व प्राचार्य डॉ. पाटील यांच्या हस्ते हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. संचालन कल्पना बन्सोड, दिगदेवतुलवार यांनी केले. जयश्री यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विकास संस्थेतील प्राध्यापक उपस्थित होते.

Web Title: Give students focused teaching importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.