चौदा वर्षानंतर मिळाला डोंगर्लाच्या शेतकºयांना मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:22 PM2017-09-24T23:22:40+5:302017-09-24T23:22:55+5:30

तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकºयांच्या शेतजमिनी गावातीलच तलावाच्या बांधकामाकरिता सन २००३ मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या.

Fourteen years later, the farmers of Mongla got compensation | चौदा वर्षानंतर मिळाला डोंगर्लाच्या शेतकºयांना मोबदला

चौदा वर्षानंतर मिळाला डोंगर्लाच्या शेतकºयांना मोबदला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकºयांच्या शेतजमिनी गावातीलच तलावाच्या बांधकामाकरिता सन २००३ मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र लघु सिंचाई विभाग शेतकºयांच्या शेतजमिनीचा मोबदला देण्यास दिरंगाई करीत होता. शेतकयांच्या न्याय हक्कासाठी विदर्भ स्वाभीमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण जांभूळे यांनी केलेल्या अविरत संघर्षाला अखेर चौदा वर्षानंतर यश आले. चिमूर दुय्यम निबंधक कार्यालय येथे शेतकºयांच्या शेतीच्या मोबदल्यांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
अतीरीक्त तहसील भिसीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या डोंगर्ला येथे जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत लघुसिंचन विभागाकडून सन २००३ ला तलावासाठी ३२ शेतकºयांच्या जमिनी संपादित करून २००५ मध्ये तलावाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र शेतकºयांना १४ वर्ष शेतीचा मोबदला मिळाला नव्हता. यादरम्यान, यातील काही शेतकºयांचा मृत्यूसुध्दा झाला आहे.
शेतजमिनीच्या मोबदल्यासाठी स्वाभीमानी संघटनेचे नारायण जांभूळे यांनी शासनाला पत्रव्यवहार केला. आंदोलन, धरणे, लघू सिंचाई विभागाला कुलुप ठोकले. उपोषण केले. अविरत संघर्ष सुरू ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. डोंगर्ला येथील बारा शेतकºयांना एक करोड ५ लाख ६३ हजार ६१६ रुपये धनादेशव्दारे वितरित करण्यात आले.
यात नथ्यु कवडू चौधरी ५ लाख ८१ हजार, कचरू रामकृष्ण चौधरी ५ लाख ६० हजार, हेमराज बाजीराव चौधरी २ लाख ८६ हजार, मानिक लक्ष्मण चौधरी १७ लाख ६३ हजार रुपये याप्रमाणे धनादेशाचे वाटप दुय्यम निबंधक कार्यालयात अभियंता एम. बी. दिकुंडवार, नारायण जांभूळे, लिपीक रमेश कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित शेतकºयांना मोबदला सध्या मिळालेला नाही. काही दिवसातच त्यांच्याही शेत जमिनीचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती जांभूळे यांनी दिली.

Web Title: Fourteen years later, the farmers of Mongla got compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.