वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘कन्या वन समृध्दी योजना’ राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:02 PM2018-06-28T14:02:58+5:302018-06-28T14:04:26+5:30

ज्या शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या दाम्पत्याने मुलीच्या नावे शासनाच्या मदतीने १० वृक्षांची लागवड करण्याचा उद्देशाने ‘कन्या वन समृध्दी योजना’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

' forest prosperity scheme' will be implemented to increase forest area and tree cover | वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘कन्या वन समृध्दी योजना’ राबविणार

वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी ‘कन्या वन समृध्दी योजना’ राबविणार

googlenewsNext
ठळक मुद्देवनमंत्र्यांच्या पुढाकाराने राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्या शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या दाम्पत्याने मुलीच्या नावे शासनाच्या मदतीने १० वृक्षांची लागवड करण्याचा उद्देशाने ‘कन्या वन समृध्दी योजना’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वैश्विक तापमान वाढीचे संकट, त्यामुळे निसर्गामध्ये झालेले फेरबदल, नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेली वाढ, वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन आणि जैवसृष्टीची स्थिरता यामध्ये सातत्याने बदल होत आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून राज्यात विविध माध्यमातून वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी वनविभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ग्रामीण भागात स्वत:ची जमीन असणाऱ्या शेतकºयांना ही योजना लाभकारक ठरणार आहे.
दरवर्षी किमान दोन लक्ष शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांचा सुध्दा विचार करणे शक्य आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने समाजातील सर्व घटकांचा कोणत्या न कोणत्या स्वरूपात सहभाग घेवून जास्तीत जास्त झाडे लावणे अनिवार्य आहे. या सर्व बाबींचा विचार करून ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

योजनेचे उद्देश
वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली आणणे, मुलगी जन्माला आलेल्या शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देवून प्रोत्साहित करणे, त्यामध्ये पाच रोपे सागाची, दोन रोपे आंबा, एक फणस, एक जांभुळ आणि एक चिंच अशा भौगौलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असेल. पर्यावरण, वृक्ष लागवड, संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादीबाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड व रूची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे, तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर अशा योजनांद्वारे काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे हे या योजनेचे उद्देश आहेत.

वनमंत्र्यांची संकल्पना
या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद केल्यानंतर ग्रामपंचायतीकडे विहीत नमुन्यात अर्ज केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यात वृक्षाच्छादन वाढावे यादृष्टीने विविध उपाययोजना करीत तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार करणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही योजना वृक्ष लागवड मोहिमेच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरणार आहे.

Web Title: ' forest prosperity scheme' will be implemented to increase forest area and tree cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार