झाडीपट्टीत फुलवले पांढऱ्या सोन्याचे रान

By admin | Published: January 4, 2017 12:54 AM2017-01-04T00:54:42+5:302017-01-04T00:54:42+5:30

पांढऱ्या सोन्याचे रान म्हटलं की वऱ्हाडाचा भाग डोळ्यासमोर उभा राहतो. विदर्भातील वऱ्हाडाचा भाग म्हणजे यवतमाळ, अमरावती, वर्धा व अकोला जिल्ह्याची आठवण येते.

Flora of white gold in the shrub | झाडीपट्टीत फुलवले पांढऱ्या सोन्याचे रान

झाडीपट्टीत फुलवले पांढऱ्या सोन्याचे रान

Next

एकरी एक लाखाचे उत्पादन : दोन एकरात सरी पद्धतीने लागवड
राजकुमार चुनारकर चिमूर
पांढऱ्या सोन्याचे रान म्हटलं की वऱ्हाडाचा भाग डोळ्यासमोर उभा राहतो. विदर्भातील वऱ्हाडाचा भाग म्हणजे यवतमाळ, अमरावती, वर्धा व अकोला जिल्ह्याची आठवण येते. तर चंद्रपूर जिल्ह्यासह, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्याला धान उत्पादन जिल्हे म्हणून ओळखले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी कृष्णाजी तपासे यांनी आपल्या दोन एकर शेतात धानाच्या शेतीसाठी अनुकूल असलेल्या जागेत पांढऱ्या सोन्याचे रान फुलविले आहे. तालुक्यात काही भागात बरेच शेतकरी कापसाची लागवड करतात. पण कृष्णा तपासे यांनी दोन एकर जागेत फुलविलेली ६५९ या कपाशीच्या वाणाची प्रायोगिक तत्त्वावर केलेली लागवड शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.
झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीकारी तालुका म्हणून व शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था असलेला तालुका म्हणून चिमूर तालुक्याला ओळखल्या जाते. याच तालुक्यात धानाची लागवड होत असल्याने तालुक्याला झाडीपट्टीचा एक भाग म्हणून ओळख मिळाली आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन व कापसाकडे बघितले जाते. मात्र या भागात कापसाचे उत्पादन होणार की नाही, या चिंतेत परिसरातील शेतकरी असतो. त्यामुळे ते जास्त प्रमाणात कपाशीची लागवड करण्यास धजावत नाहीत.
चिमूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरडवाहू शेतीत तपासे यांनी दोन एकर जागेत ६५९ या वाणाची लागवड केली. या वाणाची लागवड सरी पद्धतीने करीत खताचे व औषधीचे योग्य नियोजन केले. या योग्य नियोजनामुळे कपासीच्या एका झाडाला ७० ते ८० बोंड लागले आहेत. त्यामुळे या शेतातून एकरी २० ते २५ क्विंटल कापसाचे उत्पादन येणार आहे. पाण्याचे साधन नसल्याने कोरडवाहू कपाशीचे योग्य नियोजन करून तपासे यांनी भातासाठी पोषक असलेल्या वातावरणाच्या झाडीपट्टीत पांढऱ्या सोन्याची फुलवलेली बाग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे.

जिल्ह्यातील एकमेव सिमला मिरचीचे उत्पादक
परिस्थितीवर विसंबून न राहता नेहमी वेगळे प्रयोग करीत शेतीतून भरपूर उत्पादन घेण्याच्या दृष्टीने कृष्णा तपासे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात एकमेव सिमला मिरचीची लागवड करून एक नवा प्रयोग केला आहे. सोबतच त्यांनी भाजीपाल्यासह अद्रकाचीही लागवड केली. त्यामुळे पारंपारिक शेतीला फाटा देत तपासे हे नेहमी प्रयोगातील शेतीवर भर देत आहेत.

चिमूर येथे मागील हंगामात कॉटन इंडस्ट्रीजच्या वतीने अमृत पॅटर्नचा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात झालेल्या भाषणाने पे्ररीत होऊन ६५९ वाणांच्या कपाशीचे भरघोस उत्पन्न होऊ शकले. त्यातून अमृत पॅटर्नच्या मार्गदर्शनातून ही पांढऱ्या सोन्याची बाग बहरली. कोरडवाहू शेतीत बहरलेली ही बाग येत्या हंगामात एकरी ५० क्विंटल उत्पादन घेण्याच्या दृष्टीने एक प्रयोग करू.
- कृष्णा तपासे
प्रयोगशील शेतकरी, चिमूर

Web Title: Flora of white gold in the shrub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.