जनावरांची कत्तल रोखण्यात अपयश

By admin | Published: May 12, 2014 11:29 PM2014-05-12T23:29:17+5:302014-05-12T23:29:17+5:30

अनेक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जनावरांची मोठय़ा प्रमाणात कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून जिल्ह्यातील गोधन कमी होत आहे.

Failure to prevent slaughter of animals | जनावरांची कत्तल रोखण्यात अपयश

जनावरांची कत्तल रोखण्यात अपयश

Next

चंद्रपूर : अनेक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जनावरांची मोठय़ा प्रमाणात कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून जिल्ह्यातील गोधन कमी होत आहे. विशेष म्हणजे, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात कत्तलीसाठी जनावरांची खरेदी केली जात आहे. वेळीच लक्ष देवून जनावरांची कत्तल थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी गायीचे रक्षण करण्यासाठी गोरक्षण घरे तयार झाली आहेत. गाईचे रक्षण केले जात आहे. असे असतानाही अनेक गायी कत्तलखान्याकडे अवैध मार्गाने जात आहे. याकडे मात्र, पोलीस तथा संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

अवैध मार्गे ट्रकमधून गायीला कोंबून नेऊन कत्तलखान्यात त्यांना मशीनवर ठेवून त्यांची कटाई करण्यात येते. पोलीस प्रशासन केवळ नाममात्र अशा अवैध वाहतूक दारांवर तसेच मालकांवर नाममात्र कारवाई करतात. गायीच्या मासांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.

त्यामुळे व्यावसायिक गब्बर झाले आहेत. त्यामुळे गायीची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भविष्यात गाईला पुजण्यासाठी सुद्धा एकही गाय मिळणार नाही अशी चिन्ह आहेत. मात्र आज समाजात व्यावसायिकांकडे दलालीच्या माध्यमातून गायीची विक्री होते.

यावर वेळीच आळा घालून गायीचे रक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र-आंध्र सिमेवर मोठय़ा संख्येने उन्हात गायींना बांधून ठेवण्यात आले होते.

यासंदर्भात माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या गायींची सोडवणूक केली. जिल्ह्यात काही दिवसापूर्वी जनावरांना कत्तलीसाठी नेते जात असतानाही कारवाई मात्र होताना दिसत नाही. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Failure to prevent slaughter of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.