गोसेखुर्दच्या अस्थायी पदांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:55 PM2018-09-09T22:55:16+5:302018-09-09T22:55:43+5:30

बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अशी चर्चा प्रशासनात सुरू होती. गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजिवनी देणाराच आहे. परंतु, सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही.

Expansion of Gosekhurd's temporary posts | गोसेखुर्दच्या अस्थायी पदांना मुदतवाढ

गोसेखुर्दच्या अस्थायी पदांना मुदतवाढ

Next
ठळक मुद्दे२०० कर्मचाऱ्यांना दिलासा : प्रकल्पाच्या कामाला गती येण्याची आशा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्पासाठी शासनाने कर्मचारी आकृतीबंधाबाहेरील अस्थायी पदांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सुमारे २०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही पदे अस्थायी असल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अनिष्ठ परिणाम झाला होता, अशी चर्चा प्रशासनात सुरू होती.
गोसेखुर्द प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजिवनी देणाराच आहे. परंतु, सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकल्पाची किंमत कोट्यवधी रूपयांनी वाढली. बांधकामात गैरव्यहार झाल्याने काही अभियंता व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. काहींची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. चौकशीचा अहवालही अद्याप पूर्ण झाला नाही. कालवा आणि प्रकल्पाशी पूरक अन्य कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर खर्च वाढतच आहे. सद्यस्थितीत डावा आणि उजवा कालव्याची कामे काही प्रमाणात झाली. परंतु शेतकºयांच्या शेतापर्यंत हमखास पाणी जाऊ शकेल, याची आजही खात्री नाही. रेंगाळलेली कामे पूर्ण व्हावी, यासाठी गोसेखुर्द मंडळ नागपूर अंतर्गत येणारे सात विभाग व उपविभाग कार्यालयामध्ये ८४० कर्मचाºयांची नियुक्ती केली. यातील सुमारे २०० कर्मचारी आकृतीबंधाच्या बाहेर आहेत, अशी माहिती सुत्राने दिली.
या कर्मचाऱ्यांना सरकारने अस्थायी ठेवले होते. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर झाला होता. जलसंपदा विभागाने अस्थायी स्वरूपातील पदांना मान्यता देण्यासाठी मोठी दिरंगाई केली. एवढेच नव्हे तर उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांवर कार्यरत असणाऱ्यांनाही अभय दिले नाही. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. प्रशासकीय गतिमानता येण्यासाठी कर्मचाºयांना पाठबळ देणे गरजेचे होते.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
गोसेखुर्द उजवा कालवा उपविभाग १४, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग २ सावली तसेच उपविभाग ७, ८ व ९ मध्ये सुमारे ७० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. नागभीड, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, तालुक्यातही, कर्मचाºयांच्या फौजफाटा आहे. यातील बहुतेक कर्मचारी अस्थायी आहेत. त्यांना मुदतवाढ दिल्याने सुखावले तर दुसरीकडे गोसीखुर्दचे पाणी मिळण्यासाठी थंडबस्त्यातील कामे पूर्ण होतील, ही आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Web Title: Expansion of Gosekhurd's temporary posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.