संविधानामुळेच लोकशाहीचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:10 AM2018-01-22T00:10:05+5:302018-01-22T00:10:32+5:30

भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली.

Democracy's pride is due to the Constitution | संविधानामुळेच लोकशाहीचा गौरव

संविधानामुळेच लोकशाहीचा गौरव

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : बल्लारपूर भूषण पुरस्काराने सात जण सन्मानित

आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा जगभर गौरव केला जातो. त्यांच्या संविधानामुळे जगात भारतीय लोकशाहीच्या गौरव केला जातो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केले.
येथील भारतीय युथ टाईगर्स संघटनेच्या वतीने स्थानिक जयभीम चौक विद्यानगर वॉर्ड येथे सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्य करणाºयांना बल्लारपूर भूषण पुरस्कार व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा सत्कार समारंभ रविवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ना. अहीर बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते बल्लारपूर भूषण पुरस्काराने आनंद तेलंग, प्रतीक तितरे, डॉ. पी. यू. जरीले, सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास सुंचूवार, नगरसेवक विनोद यादव, कुसूम वानखेडे, आदित्य शिंगाडे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी ना. अहीर म्हणाले, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया कार्यकर्त्यांचे यश राजकीय मंडळी हिरावून घेतात. मात्र त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व अन्य क्षेत्रात प्रचंड संघर्ष केला. त्यामुळेच ते देशाचे भाग्यविधाते ठरले. त्याचे प्रेरणादायी विचार कोणीही दडपू शकत नाही. त्यांच्या विचारावर आधारीत नवीन क्रांती समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात लोकशाही शासन व्यवस्था आहे, असे ते म्हणाले.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, युथ टाईगर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झामरे, प्रशांत मेश्राम, प्रदीप उमरे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांची उपस्थिती होती. दरम्यान क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे अरुण हजारे, अमरनाथ एक्का, आश्विनी उके, इंद्रजित, निशाद, मनोजडे, स्वाती हजारे, निता वर्मा, सुनील माझी, अंकीता चौधरी, रोहिनी डांगे, पारस कौशीक, रमेश नातरर्गी, पास्टर पोर्तलावार यांना खेलरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत झामरे यांनी केले. संचालन अ‍ॅड. पवन मेश्राम यांनी तर आभार रविकुमार पुप्पलवार यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Democracy's pride is due to the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.