‘मिनरल’च्या नावावर दुर्गंधीयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:42 PM2018-07-26T23:42:29+5:302018-07-26T23:43:27+5:30

आजघडीला पानटपऱ्यांपासून तर रस्त्यांवर मिनरल वॉटरच्या नावाखाली दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना विकण्याचा सपाटा काही कंपन्यांनी सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावांनी अनेक कंपन्या दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल यामाध्यमातून करीत असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे.

 Dangerous water in the name of 'mineral' | ‘मिनरल’च्या नावावर दुर्गंधीयुक्त पाणी

‘मिनरल’च्या नावावर दुर्गंधीयुक्त पाणी

Next
ठळक मुद्देलाखोंची उलाढाल : अन्नभेसळ कायद्याची सर्रास पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आजघडीला पानटपऱ्यांपासून तर रस्त्यांवर मिनरल वॉटरच्या नावाखाली दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना विकण्याचा सपाटा काही कंपन्यांनी सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या नावांनी अनेक कंपन्या दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल यामाध्यमातून करीत असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे. असा प्रकार शहरात व जिल्ह्यात होत असतानाही अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ आहे. त्यामुळे या गोरखधंद्यात अधिकारी व कंपनी चालकांची मिलिभगत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
जिल्ह्यात रोज पाऊच, तसेच पाणी बॉटल व जारच्या माध्यमातून हजारो लिटर मिनरल वॉटर विकल्या जाते. मात्र नागरिक त्या पाऊच, बॉटलवरील बॅच नंबर व पॅकींगची तारीख देखिल पाहण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे तहानेने व्याकुळ झालेले नागरिक नकळत दुर्गंधीयुक्त पाणी पितात.
अन्न व भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ च्या नियम १९५५ अन्वये कुठल्याही तयार मालाची पॅकींग करताना त्यावर पॅकींगची तारीख आणि बॅच नंबर नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र शहरात व जिल्ह्यात रोज लाखोच्या संख्येत विकल्या जाणाºया पाऊचवर बॅच नंबर व पॅकींगची तारीख लिहिलेलीच नसते. त्यामुळे विविध कंपन्यांतून तयार होणाºया पाऊच व बाटल्यांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिनरल वॉटर तयार करणाºया कंपन्या नियमांची सर्रास पायमल्ली करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकत असताना अन्न व औषधी प्रशासनाने आजतागायत कुठलीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.
काही वर्षांपूर्वी मिनरल वॉटरचे फॅड फक्त शहरी भागातच होते. मात्र आता ग्रामीण भागातीलही गल्लीबोळात पाण्याचे पाऊच विकले जातात. जिल्ह्यात तयार होणाºया मिनरल वॉटरची परजिल्ह्यातील लगतच्या गावांतही विक्री केली जाते. अनेक गावांतील बसस्थानकांवर तर हमखास हे पाणी पाऊच मिळतात. मात्र विकत घेतलेल्या पाऊचमधील पाणी किती शुद्ध आहे, याची शहानिशा न करताच प्रवासीही पाणी पितात. काही पाऊचमधील पाण्याची तर दुर्गंधी येत असतानाही पाणी विकले जाते.
या मिनरल वॉटरचा गोरखधंदा चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे मिनरल वॉटरच्या विक्रीबाबत नियम कडक करण्याची गरज आता निर्माण झाली असून शासनाने याकडे लक्ष द्यावे.
जारच्या पाण्याची शुद्धता काय?
चंद्रपूर शहरात दररोज सकाळी १० वाजताच्या सुमारास अनेक टेम्पो पाण्याने भरलेले जार विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांत पोहोचवितात. त्यामुळे पाण्याच्या जारने भरलेल्या टेम्पोची रस्त्यावर गर्दी दिसते. २५ ते ३० रूपये या जारचे आकारले जाते. मात्र या जारमधील पाणी कितपत शुद्ध आहे, याची कुणीही शहानिशा करीत नाही. अनेकदा जार बाहेरून चिखलाने किंवा धुळीने माखलेले असतात. मात्र याच जारमधून पाणी दिले जाते. त्यामुळे जारमध्ये पाणी भरताना जार किती स्वच्छ केले जातात, याची प्रचिती येते. मात्र नागरिकही जारचे पाणी, शुद्ध पाणी म्हणून विविध कार्यालय तसेच घरगुती कार्यक्रमात जारच्या पाण्याचा सर्रास वापर करतात. याचाच फायदा घेत अनेकदा कार्यक्रमादरम्यान ५० जारमध्ये दहा जारचे पाणी दंड नसले किंवा शुद्ध नसले तरी ते लक्षात येत नाही. आपण विकत घेतलेले पाणी शुद्ध आहे किंवा नाही, हे तपासण्याचे कोणतेही यंत्र किंवा मशिन ग्राहकाकडे नसल्याने पाणी विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनानही पाणी प्लांटची तपासणी करून कारवाई केल्याची एकही कारवाई आजपर्यंत जिल्ह्यात झालेली नाही. आतातरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबविण्याची गरज आहे.

Web Title:  Dangerous water in the name of 'mineral'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.