गडचांदुरात सांस्कृतिक सभागृह तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:55 PM2019-02-25T22:55:07+5:302019-02-25T22:55:35+5:30

कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ शहर आहे. येथील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने येथे सांस्कृतिक सभागृह बांधावे, अशी मागणी जे.एम.डी.कला अकादमीतर्फे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Create a cultural hall in Gadchandur | गडचांदुरात सांस्कृतिक सभागृह तयार करा

गडचांदुरात सांस्कृतिक सभागृह तयार करा

Next
ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ शहर आहे. येथील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने येथे सांस्कृतिक सभागृह बांधावे, अशी मागणी जे.एम.डी.कला अकादमीतर्फे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गडचांदुरात सांस्कृतिक सभागृह नसल्यामुळे आयोजक व कलावंताना अनेक अडचणीना समोर जावे लागत आहे. परिणामी नाट्यप्रेमी प्रेक्षकांची हिरमोड होत असून नाराजीचा सुर उमटत आहे. गडचांदूर शहर हे जिवती, कोरपना या दोन्ही तालुक्यातील मोठी मध्यवती बाजारपेठ आहे. तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील कलावंताच्या कलेला वाव मिळावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन सभागृह उभारावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना मयुर एकरे, बंटी गुरुनुले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Create a cultural hall in Gadchandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.