पाण्यासाठी महिलांचा कंत्राटदाराला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:27 PM2019-04-12T22:27:00+5:302019-04-12T22:27:21+5:30

नवीन चंद्रपूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. ही टंचाई कंत्राटदार करीत असल्याच्या भावनेतून येथील महिलांनी शुक्रवारी म्हाडाच्या कार्यालयात धडक दिली. एवढेच नाही तर, त्याला चांगलेच धारेवर धरले.

To circumvent women contracts for water | पाण्यासाठी महिलांचा कंत्राटदाराला घेराव

पाण्यासाठी महिलांचा कंत्राटदाराला घेराव

googlenewsNext
ठळक मुद्देम्हाडा कॉलनीत पाणीबाणी: आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नवीन चंद्रपूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. ही टंचाई कंत्राटदार करीत असल्याच्या भावनेतून येथील महिलांनी शुक्रवारी म्हाडाच्या कार्यालयात धडक दिली. एवढेच नाही तर, त्याला चांगलेच धारेवर धरले. महिलांचा आक्रमण पवित्रा बघता कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात चर्चा करण्यात आली. यावरही महिलांचे समाधान झाले नाही. त्यानंतर महिलांनी पाणी पुरवठा करणाºया एमआयडीसी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
चंद्रपूर शहरात आता जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांचा ओढा नवीन चंद्रपूरकडे आहे. त्यातच म्हाडाचे घर कमी किंमतीत मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी म्हाडाला पसंती दिली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे नागरिकांची संख्या वाढत आहे. म्हाडा कॉलनीला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. त्यानंतर कंत्राटदारामार्फत कॉलनीमध्ये पाणी पुरविल्या जाते. मागील काही दिवसांपासून येथे अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच मागील आठ ते दहा दिवसांपासून पाणी पुरवठा पुर्णत: ठप्प झाला आहे. त्यामुळे महिलांचा पारा भडकला आणि त्यांनी थेट म्हाडाच्या कार्यालयात आपला मोर्चा नेला. यावेळी पाणी पुरवठा कंत्राटदार डी.पी. आत्राम यांना घेराव घातला. महिलांचा रोष बघता येथील कर्मचाºयांनी पोलीसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस म्हाडाच्या कार्यालयात पोहचले. पोलिसांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी कंत्राटदाराने एमआयडीसी कडून पाणी पुरवठा होत नसल्याने आपण पाणी पुरवठा करण्यास असमर्थ असल्याचे महिलांना सांगितले. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर कंत्राटदारासह येथील अधिकाºयांना घेऊन महिलांनी थेट एमआयडीसी कार्यालय गाठले. येथील अधिकाºयांना पाणी पुरवठा होत नसल्याबाबत जॉब विचारला. यावेळी अधिकाºयांनी नदीतील पाण्याती पातळी कमी असल्यामुळे योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण सांगितले. मात्र त्यांचे समाधान झाले नसून पाणी पुरवठ करण्याची मागणी लागून धरली.

कंत्राटदाराच्या कामगाराला मारहाण
म्हाडा परिसरात पाणी पुरवठा करण्याची ज्या कंत्राटदारावर जबाबदारी आहे. त्याच्या कामगाराला काही दिवसापूर्वी येथील नागरिकांनी नियमित पाणी पुरवठा करीत नसल्यामुळे मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो कामगार काम सोडून गेल्याचे समजते.
टँकरचालकाला मारहाण
काही दिवसांपासून म्हाडा कॉलनीमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र काहीनी टँकरचालकाला शिविगाळ तसेच मारहाण केली. त्यामुळे टँकरचालक येथे जाण्यास नकार देत असल्याने पोलीस बंदोबस्तात पाणी पुरवठा करण्यात आला.

म्हाडा कॉलनीमध्ये एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून पाण्याचा दाब कमी असल्यामुळे कॉलनीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. एमआयडीसीकडून पाणीच आले नसल्याने आम्ही पाणी पुरवठा करण्यास असमर्थ आहे. आम्ही केवळ आलेले पाणी वितरित करतो. योग्य दाबाने पाणी मिळाल्यास पुरवठा केला जाईल.
-डी.पी. आत्राम,
पाणी पुरवठा कंत्राटदार, म्हाडा चंद्रपूर

म्हाडामध्ये एमआयडीसी आणि जीवन प्राधिकरणाकडून पाणी घेतल्या जाते. मुळात नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने हा गोंधळ झाला. यासाठी डॅम तसेच इतर नदीतून पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांसह इतर अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.
- श्रीमती टेंभुर्णे,
कार्यकारी अभियंता, म्हाडा

Web Title: To circumvent women contracts for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.