The bevy given in the morning; Balaji ward in Chandrapur blows up; | सकाळीच दिले अस्वलाने दर्शन; चंद्रपूरच्या बालाजी वॉर्डात उडाली गडबड
सकाळीच दिले अस्वलाने दर्शन; चंद्रपूरच्या बालाजी वॉर्डात उडाली गडबड

ठळक मुद्देबेशुद्ध करून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहराची दाट वस्ती असलेल्या बालाजी वॉर्डात शनिवारी सकाळी चक्क एक अस्वल नागरिकांच्या नजरेस पडले आणि एकच गडबड उडाली. एरव्ही बिबट किंवा वाघ गावात शिरण्याच्या बातम्यांची सवय असताना, अचानक अस्वल दिसल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. हे अस्वल बालाजी वॉर्डातील एखा झुडुपात दडलेले होते. नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वनविभागाला पाचारण केले. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या अस्वलाला बेशुद्ध करून ताब्यात घेतले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. चंद्रपूर शहराच्या या भागालगत कुठलेच जंगल नसताना हे अस्वल तिथपर्यंत कसे पोहचले याबाबत जनसामान्यांत कुतूहल व्यक्त केले जात आहे.


Web Title: The bevy given in the morning; Balaji ward in Chandrapur blows up;
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.