नववर्षाच्या प्रारंभीच कामगारांचे साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:24 PM2018-01-01T23:24:22+5:302018-01-01T23:25:18+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ८ ते १० वर्षांपासून काम करणाºया १३७ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले.

At the beginning of the new year workers' fasting fasting | नववर्षाच्या प्रारंभीच कामगारांचे साखळी उपोषण

नववर्षाच्या प्रारंभीच कामगारांचे साखळी उपोषण

Next
ठळक मुद्देकामावर घ्या : रुग्णालय व्यवस्थापनाने केले कामावरून कमी

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ८ ते १० वर्षांपासून काम करणाºया १३७ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले. रुग्णालय व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात प्रहारच्या नेतृत्वात या कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ठिय्या आंदोलनानंतर या कामगारांनी नववर्षाच्या प्रारंभी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. सोमवारपासून जटपुरा गेटवर या कामगारांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी, जननी शिशू सुरक्षा योजना, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक अशा विविध व संवेदनशील ठिकाणी काम करणाºया या कर्मचाºयांना अचानक कामावरून काढल्याने दवाखान्यातील अत्यावश्यक सेवा प्रभावित झालेल्या आहेत.
दरम्यान, सोमवारी पहिल्या दिवशी श्वेता भालेराव, लता उईके, माया वांढरे, विश्रांती खोब्रागडे, कांचन चिंचेकर, किशोर रोहणकर, प्रफुल्ल बजाईत, विक्की दास, प्रमोद मंगरुळकर, सुशिला डोर्लीकर हे सकाळी १० वाजतापासून उपोषणाला बसले आहेत.
यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक पप्पु देशमुख, मनिषा बोबडे, मिना कोंतमवार, घनश्याम येरगुडे, इमदाद शेख, हरिदास देवगडे, निलेश पाझारे, सतीश खोब्रागडे, प्रफुल्ल बैरम, अमुल रामटेके, गितेश शेंडे आदी उपस्थित होते.
आंदोलन मागे घेणार नाही
जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कंत्राटाची मुदत मागील मार्च २०१७ मध्ये संपली होती. त्यानंतर कंत्राटदारास मुदतवाढ देण्यात आली. मध्यंतरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी नव्याने निविदा काढून २३६ कामगारांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेतले. विशेष म्हणजे, जुन्याच कंत्राटदाराला नवीन काम देण्यात आले. मात्र आठ ते दहा वर्षांपासून काम करणाऱ्या जुन्या कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा विचार करण्यात आला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय हे आधी शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत काम करीत होते. आता हे रूग्णालय मेडीकल कॉलेज म्हणजेच वैद्यकीय शिक्षण मंत्रालयांतर्गत अस्थायी स्वरूपात म्हणजे तीन वर्षांसाठी काम करणार आहे. सध्या या रूग्णालयातील स्थायी कर्मचारी- अधिकारी हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निधीतून पगार घेतात व वैद्यकीय शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या मेडीकल कॉलेजला सेवा देतात. अशाच प्रकारे जुन्या कंत्राटी कामगारांचे समायोजन करणे शक्य होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या चुकीमुळे १३७ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली निघल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी दिला.

Web Title: At the beginning of the new year workers' fasting fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.