नोकरी करु की शिक्षण पूर्ण करु?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:44 PM2017-08-10T15:44:36+5:302017-08-10T16:32:14+5:30

हातातली नोकरी सोडून पुढे शिकावं का, असा टप्पा आला तर?

education or job? how to choose | नोकरी करु की शिक्षण पूर्ण करु?

नोकरी करु की शिक्षण पूर्ण करु?

Next
ठळक मुद्देनिर्णय कुठलाही घेतला तरी फायदे तोटे आहेतच, आपली प्रायॉरिटी काय हे आपण ठरवायचं.

- योगिता तोडकर 

प्राजक्ता माझ्याकडे आलीच गंभीर चेहर्याने. 27 वर्षाची चुणचुणीत प्राजक्ता नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करत होती. तिला पीएचडीसाठी परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला होता व शिष्यवृत्तीदेखील मिळाली होती. ती म्हणाली, ‘चांगली नोकरी सोडून मी पीएचडीचा विचार करावा का, की नोकरीच चालू ठेवावी, कळतच नाहीये. जर मी जायचं ठरवलं तर माझ्या वैयिक्तक, कौटुंबिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतील, पण पीएचडी नंतर चांगली नोकरी लागेल, यशस्वी आयुष्य जगू शकेन. एक मन म्हणत मी जावं, एक मन म्हणत नको. काय करू?’

प्राजक्ताला घ्यावा लागणार होता, असे आणि यापेक्षा महत्वाचे निर्णय आपल्याला आयुष्यात घ्यावे लागतात. आणि अशा वेळेस समोर असणार्‍या पर्यायांमधून एक आपल्याला निवडायचा असतो. कारण दोन्ही पर्यायातील नकारात्मक आणि सकारात्मक मुद्द्यांमध्ये चढाओढ चालू झालेली असते. आणि मग मन चंचल बनतं. अशा अस्थिर अवस्थेत निर्णय घेतल्यावर विपरीत परिणाम सामोरे येणार हे निश्चितच असते. तसेही आपल्याला निर्णय हा घ्यायचा असतोच, तर मग स्थिर व शांत मनाने का घेऊ नये?

जेंव्हा आपल्याला जलद व योग्य निर्णय घ्यायचे असतात तेंव्हा विचारांना नेमकी दिशा दिल्यास मनाला स्थैर्य येऊ शकते. आणि मग मन नेमका कौल देऊन निर्णयासाठी मदत करते.

निर्णय घेण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घ्याव्यात. सर्वात आधी, प्रत्येक निर्णय म्हणजे शिकण्याची नवी संधी. एकदा निर्णय घेतला कि त्यावर ठाम राहणं. कारण त्याला फाटे फोडत राहिलो तर निर्णय घेणं तर होतच नाही पण अस्वस्थता वाढत जाते.

दर वेळेस आपले निर्णय शंभर टक्के बरोबर असतीलच हे गरजेचे नाही, पण त्यातून जी परिस्थिती समोर येते तिला कसं हाताळावं, त्यात आपल्याला हवे तसे अनुकूल बदल कसे घडवून आणावेत हे शिकणं होतं. निर्णय घेताना मन अंतज्र्ञानी असण्यापेक्षा स्थिर व स्वतर्‍शी प्रामाणिक असणं गरजेचं असतं. कारण आपण जर घेतलेल्या निर्णयाला फाटे फोडत राहिलो तर आपले आत्तापर्यंतचे अनुभव, मिळालेले ज्ञान, आपल्या संवेदनातून मिळणारे ज्ञान, व भविष्यात काय घडू शकते याबद्दलची कल्पना असूनदेखील मन नेमकेपणाने निर्णय घेऊ शकत नाही.

अशा पद्धतीने विचारानं नेमक्या दिशेने वळवल्यास दोन पर्यायातील एक पर्याय निवडून त्यावर काम करणं सहज होतं व मानिसक स्थैर्य राहतं. तसेच कृतीला निश्चितता येते.

(लेखिका समुपदेशक आहेत )

Web Title: education or job? how to choose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.