युवक काँग्रेसच्यावतीने सद्भावना मॅरेथॉन दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:21 AM2017-08-21T00:21:15+5:302017-08-21T00:21:19+5:30

मेहकर: मेहकर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी  यांच्या जयंतीनिमित्त २0 ऑगस्ट रोजी डोणगाव येथे सद्भावना  मॅरेथॉन दौड कार्यक्रम पार पडला.

Youth Congressman Goodbye Marathon Race | युवक काँग्रेसच्यावतीने सद्भावना मॅरेथॉन दौड

युवक काँग्रेसच्यावतीने सद्भावना मॅरेथॉन दौड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: मेहकर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी  यांच्या जयंतीनिमित्त २0 ऑगस्ट रोजी डोणगाव येथे सद्भावना  मॅरेथॉन दौड कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.प्र.काँ.चे सरचिटणीस श्याम  उमाळकर हे होते. तर जि.प. सदस्य मनोज कायंदे, लक्ष्मण घुमरे,  आश्रूजी काळे, मेताकाँचे अध्यक्ष देवानंद पवार, शहराध्यक्ष कलीम  खान, सनियंत्रण समितीचे जिल्हा सरचिटणीस शैलेश बावस्कर,  विनोद पर्‍हाड, प्रकाश अडेलकर, मेहकर विधानसभा युवक  काँग्रेसचे रवी मिस्कीन, मेतायुकाँचे अध्यक्ष रवी निकम, डोणगाव  युवक काँग्रेसचे जैनुल आबेद्दीन यांची  प्रमुख उपस्थिती होती.   डोणगाव येथील संत गजानन महाराज मंदिरापासून मान्यवरांच्या  हस्ते तिरंगा ध्वज दाखवत सद्भावना मॅरेथॉन दौडला सुरुवात  करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस शुभम राठोड  चिखली, द्वितीय अर्जुन साळवे चिखली, तृतीय स्वप्निल सदावर्ते  जवळा, चतुर्थ अक्षय चव्हाण चिखली, तर पाचवे बक्षीस सदानंद  बोरकर डोणगाव यांनी पटकाविले. यावेळी गजानन सातपुते,  रफिकभाई, रजनीकांत कांबळे, संतोष डोंगरदिवे, डॉ. शेषराव  बदर, गणेश मोसंबे, संतोष शेळके, किशोर अडेलकर, संदीप ढोरे,  अबरार कुरेशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी  मिस्कीन यांनी केले. सूत्रसंचलन शैलेश बावस्कर यांनी तर आभार प्रदर्शन रवी निकम यांनी केले. 

Web Title: Youth Congressman Goodbye Marathon Race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.