दागिन्यांची बॅग लंपास करणारी महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:03 AM2017-10-30T00:03:20+5:302017-10-30T00:04:06+5:30

चिखली: सतत वर्दळीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता असलेल्या  येथील डीपी रोडस्थित कृष्ण ज्वेलर्स या सराफा दुकानातून  दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास करणार्‍या महिलेला चिखली  पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हय़ातील गेवराई येथून  अटक करून १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळविला आहे.

A woman carrying a jewelery bag | दागिन्यांची बॅग लंपास करणारी महिला गजाआड

दागिन्यांची बॅग लंपास करणारी महिला गजाआड

Next
ठळक मुद्देसराफा दुकानातून लंपास केली होती दागिन्यांनी भरलेली बॅग बॅग लंपास करणारी महिला चिखली पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: सतत वर्दळीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता असलेल्या  येथील डीपी रोडस्थित कृष्ण ज्वेलर्स या सराफा दुकानातून  दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास करणार्‍या महिलेला चिखली  पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हय़ातील गेवराई येथून  अटक करून १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळविला आहे. या प्रकरणातील आणखी दोन महिला अरोपींचा शोध सुरू  आहे.
स्थानिक डी.पी. रोडवर बसस्थानक परिसरात भगवान वाळेकर  यांचे o्रीकृष्ण ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. २३ ऑ क्टोबरच्या सकाळी १0 वाजता भगवान वाळेकर हे दुकानातील  कामात व्यस्त होते, तर मुलगा अजय वाळेकर दुकानाची  साफसफाई करत असताना त्यांनी काउंटरवर दागिन्यांच्या दोन  बॅगा ठेवल्या होत्या. त्यापैकी एकात सोन्याचे दागिने होते तर  एकात चांदीचे दागिने होते. दरम्यान, लाल रंगाची साडी नेसलेल्या  महिलेने दुकानात प्रवेश करून वाळेकर पिता-पुत्राची नजर  चुकवित चांदीच्या चेनपट्टी व इतर सुमारे २ लाख ४0 हजार रुपये   किमतीच्या ८ ते १0 किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्यांची बॅग  लंपास केली होती. 
सदर महिलेची चोरी सीसी कॅमेर्‍यात कैद झाली होती. त्याआधारे  चिखली पोलिसांनी तपास चालविला होता. याअंतर्गत सदर सीसी  फुटेज सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले होते. ३0 एप्रिल  २0१७ रोजी खामगाव शहरात याचप्रकारे मीरा विठ्ठल शिंदे व  रंजना राजेश क्षीरसागर या दोन महिलांनी चोरी केली होती. त्यांना  अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हेदेखील दाखल होते; मात्र  सध्या त्या दोघींची जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती  दिली, तर महिला पोलीस मार्गट यांनी सीसी फुटेजमधील  महिलांची ओळख पटविल्याने ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या नेतृ त्वात पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू, पोहेकॉ तायडे,  पोकॉ सोनकांबळे, पोकॉ तांबेकर, मपोकॉ पवार यांनी गेवराई ये थून रंजना राजेश क्षीरसागर (वय २५ वष्रे) रा. संजय नगर  गेवराई हिला अटक केली आहे. दरम्यान, अटकेतील महिला  अरोपी रंजना क्षीरसागर हिला न्यायालयासमोर उभे केले असता  न्यायालयाने १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी ठोठावली आहे. 
या प्रकरणाती मुख्य आरोपी शकुनाबाई भुर्‍या शिंदे व अन्य एक  महिला फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान  या प्रकरणातील महिलांनी यापूर्वी कर्नाटकमध्येसुद्धा सराफा  दुकानातून अशाच प्रकारे बॅग चोरल्या असून, या महिला  टोळीद्वारे केलेल्या अशा गुन्हय़ांची अनेक प्रकरणे उघडकीस  येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोउपनि सुधाकर गवारगुरू,  पोकाँ उमेश शेगोकार करीत आहेत. 

Web Title: A woman carrying a jewelery bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा