कृषी सेवा केंद्रांवर राहणार वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 03:15 PM2019-05-14T15:15:31+5:302019-05-14T15:15:37+5:30

शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे.

 Watch on krushi seva kendra | कृषी सेवा केंद्रांवर राहणार वॉच!

कृषी सेवा केंद्रांवर राहणार वॉच!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खरीप हंगामाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे पथक गठित करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.
खामगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषीसेवा केंद्र धारकांना विविध सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाची अनियमितता, कीड रोगांच्या प्रादुर्भावानुसार वाढलेली महागाई लक्षात घेता खरिप हंगामामध्ये कृषी विकास यंत्रणेने योग्य वाणाची लागवड करण्यास शेतकºयांना प्रवृत्त करावे. यामुळे शेतकºयांचा उत्पादनावरील खर्च कमी होवून शेतकºयांची आर्थिक उन्नती होईल.
कृषीसेवा केंद्रधारक हा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दूवा आहे. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याचे काम कृषी सेवा केंद्र धारकांचे आहे. हे काम कृषी सेवा केंद्र धारकांनी करावे. यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करुन चांगल्या प्रतीच्या गुणवत्तापूर्ण निविदा शेतकºयांना पुरवाव्या. फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशा सुचना कृषी सेवा केंद्रधारकांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. कृषी सेवा केंद्र धारकांकडून सुचनांचे पालन न झाल्यास तसेच शेतकºयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यास, कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक!
शेतकºयांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांंचा पुरवठा व्हावा, यासाठी तालुका कृषी अधिकारी गिरी यांच्या नेतृत्वात गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाकडून ठिकठिकाणी अचानक भेटी देण्यात येणार आहेत. शेतकºयांची कुठेही फसवणूक होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना याआधीच देण्यात आल्या असल्या, तरी या पथकाद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. कृषी सेवा केंद्र धारकांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहनही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Web Title:  Watch on krushi seva kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.