‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेस आज निघणार; भक्तांची रेल्वेस्टेशनवर सकाळपासूनच गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:23 PM2019-07-07T12:23:35+5:302019-07-07T12:23:47+5:30

खामगाव-  आषाढी एकादशी निमीत्य पंढरपूर येथे ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेसच्या चार गाडया सोडण्यात येणार आहेत.  यावेळी हया गाडीला १६ ऐवजी १८ डब्बे असणार आहेत. 

Vitthal Darshan Express will leave today; rush of devotees on railway station | ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेस आज निघणार; भक्तांची रेल्वेस्टेशनवर सकाळपासूनच गर्दी 

‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेस आज निघणार; भक्तांची रेल्वेस्टेशनवर सकाळपासूनच गर्दी 

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क 
खामगाव-  आषाढी एकादशी निमीत्य पंढरपूर येथे ‘विठ्ठल दर्शन’ एक्स्प्रेसच्या चार गाडया सोडण्यात येणार आहेत.  यावेळी हया गाडीला १६ ऐवजी १८ डब्बे असणार आहेत. 
        खामगाव व परिसरातील विठठल भक्तांसाठी आषाढी यात्रा स्पेशल विठठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते.  यावर्षी डब्यांमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी विठठल दर्शन एक्सप्रेसला केवळ १६ डब्बे असतात परंतु या वर्षी सदर स्पेशल रेल्वेला  १६ ऐवजी दोन डब्बे वाढवून १८ डब्ब्याची रेल्वे सोडण्यात येणार आहे.  त्यामुळे दरवर्षी पेक्षा जास्त भाविकांना आता पंढरपूर दर्शन वारीला जाता येणार आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी रेल्वेमंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन डब्बे वाढले आहेत. विठ्ठल दर्शनची  पहिली रेल्वे दुपारी ४.२० वाजता निघेल. त्यानंतर  दुसरी उद्या रविवार ०७ जुलै, तीसरी रेल्वे ०८ जुलै, चवथी रेल्वे १० जुलै रोजी सोडण्यात येणार आहे.  आज रविवारी दुपारी ४ वाजता याठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात येणार आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्याहस्ते विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. सकाळी ११ वाजेपासून खामगाव येथील रेल्वेस्टेशनवर भाविकांनी गर्दी केलेली दिसून आली. 
(प्रतिनिधी)

Web Title: Vitthal Darshan Express will leave today; rush of devotees on railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.