रविवारी विदर्भस्तरीय तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:35 AM2017-11-20T00:35:11+5:302017-11-20T00:41:33+5:30

बुलडाणा: पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन  २६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आले असून, संत गाडगेबाबा  अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या हस्ते या  संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

Viderbha level Tukdoji Maharaj Sahitya Sammelan on Sunday | रविवारी विदर्भस्तरीय तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

रविवारी विदर्भस्तरीय तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

Next
ठळक मुद्देविविध परिसंवद भारतीय विचार मंचातर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन  २६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात आयोजित करण्यात आले असून, संत गाडगेबाबा  अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांच्या हस्ते या  संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून वारी भैरवगड येथील ज्ञानेश आश्रमाचे हरिभक्त परायण  ज्ञानेश्‍वर महाराज वाघ उपस्थित राहणार आहे. बुलडाणा येथील पंकज लद्धड  इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड मॅनेजमेंट स्टडीज आणि भारतीय विचार मंच  विदर्भ यांच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती १९  नोव्हेंबर रोजी स्थानिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये  भारतीय  विचार मंचचे संयोजक सुभाष लोहे यांनी दिली. यावेळी संमेलनाचे संयोजक रवींद्र  लद्धड, प्राचार्य प्रदीप जावंधिया, सह संयोजक प्रवीण चिंचोळर, प्रसिद्धी प्रमुख बाळ  अयाचित प्रामुख्याने उपस्थित होते. नेरी (चंद्रपूर), भंडारा, लाखांदूर, यवतमाळनं तर आता बुलडाण्यात हे संमेलन होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या  साहित्यावर आधारित विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन चार वर्षांपासून  आयोजित केले जात आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यावर अधिक चिंतन व्हावे, ग्रामगी तेमध्ये सामान्य माणसाच्या कर्तव्यशीलतेबाबत अनेक बाबींचा ऊहापोह केला  आहे. अध्यात्मातून राष्ट्रभक्ती हा दृष्टिकोन समोर ठेवून हे संमेलन आयोजित  करण्यात येत असल्याचे सुभाष लोहे म्हणाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून  खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशीष चौबिसा, गुरुकुंज आश्रमाचे अ.भा.  सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, नांदुरा आश्रमाचे आचार्य हरिभाऊदादा वेरुळकर  गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमरावतीचे प्रख्यात वक्ते  प्राचार्य अरविंद देशमुख यांचे समारोपीय भाषण होईल.
साहित्य संमेलनात अध्यात्मबोध व राष्ट्रबोध या दोन विषयावरील परिसंवादाचे  आयोजन करण्यात आले असून, अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्राचार्य शांताराम बुटे,  अकोला, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, नागपूर हे उपस्थित राहणार आहेत. उपविषयांवर  डॉ. विकास बाहेकर, प्रा. मारेश्‍वर देशमुख, आष्टी, अरुण नेटके, प्रा. राजीव  बोरकर यांच्यासह अन्य उपस्थित राहतील. या एकदिवसीय संमेलनात सकाळी  आठ वाजता ग्रंथदिंडी निघेल, साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल.  सायंकाळी चार ते पाच या कालावधीत समारोप सत्र होईल. 
या संमेलनास बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्हय़ातील विद्वतजन, शिक्षण संस्थांचे  संचालक, प्राध्यापक, अध्यापक, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील नेतृत्व  कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष आशीष चौबिसा,  इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. दीपक लद्धड, संमेलनाचे संयोजक रवींद्र लद्धड व सह  संयोजक प्रवीण चिंचोळकर यांनी केले आहे.     

Web Title: Viderbha level Tukdoji Maharaj Sahitya Sammelan on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.