घरावर झाड कोसळून मातेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 10:01 PM2019-06-22T22:01:34+5:302019-06-22T22:01:45+5:30

घाटपुरी येथील घटना। मृतकांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

Two child and mother died due to tree collapse at home | घरावर झाड कोसळून मातेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

घरावर झाड कोसळून मातेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Next

खामगाव : पावसासोबत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यात दबून तिघा मायलेकांचा करूण अंत झाला. घरावर कोसळलेले झाड, क्रेनच्या साहाय्याने उचलण्यात आल्यानंतर तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

 
घाटपुरी येथील आनंद नगरातील गुणवंत हिरडकर यांच्या झोपडीवर झाड कोसळले. त्यावेळी घरातील शारदा गुणवंत हिरडकर (२८), सृष्टी गुणवंत हिरडकर (३) आणि ऋषिकेश गुणवंत हिरडकर (२) हे तिघे मायलेक दबले. पोलिस आणि नागरिकांनी क्रेनच्या साहाय्याने झाड उचलल्यानंतर तिघांनाही बाहेर काढण्यात आले. नागरिकांनी त्यांना सामान्य रूग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी दोन चिमुकल्यासंह मातेला मृत घोषित केले. 
या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र देशमुख, भाजपचे सागर फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी सामान्य रूग्णालयात भेट दिली.

वीज कोसळून एक जखमी
अंगावर वीज कोसळल्याने तायडे कॉलनीतील विजय देशमुख (५०) हे जखमी झाले. शहरातील आदर्श नगरातून जात असताना पावसामुळे ते एका झाडाखाली थांबले. त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने, देशमुख जखमी झाले.

Web Title: Two child and mother died due to tree collapse at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.