टिप्परची कारला धडक; सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:06 AM2017-10-30T00:06:57+5:302017-10-30T00:07:42+5:30

खामगाव: टिप्परची कारला धडक लागून सहा जण जखमी  झाल्याची घटना शेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळ रविवारी  घडली.

Tipper's car hit; Six injured | टिप्परची कारला धडक; सहा जखमी

टिप्परची कारला धडक; सहा जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देशेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळील घटनाशेगाव येथून दर्शन घेऊन कारने खामगावकडे येत होते भाविक

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: टिप्परची कारला धडक लागून सहा जण जखमी  झाल्याची घटना शेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळ रविवारी  घडली.
जळगाव खांदेश व नाशिक येथील भाविक कार क्रमांक एमएच  १५ एफ एन 00२६ ने शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे  दर्शन घेऊन खामगावकडे येत होते. त्यावेळी शेगावकडे  जाणार्‍या टिप्पर क्रमांक एमएच ३२ बी ९0१६ ने कारला  समोरून धडक दिली. यामध्ये टिप्पर प्रवासी निवार्‍याला धडकून  उलटले. तसेच कारसुद्धा रस्त्याखाली जाऊन पडली. यामध्ये  नाशिक येथील उज्ज्वला प्रशांत बारी (३२), द्वारका नीलेश  बारी (३३), प्रशांत वासुदेव बारी (३३), हर्ष प्रशांत बारी  (६), वैष्णवी नीलेश बारी (४), जळगाव येथील सुवर्णा  नीलेश बारी (१५) हे जखमी झाले. जखमींना सामान्य  रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघा तात कारचे नुकसान झाले. 

Web Title: Tipper's car hit; Six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात