सिनेस्टाइल घरफोडी करणा-या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:04 AM2017-07-27T02:04:36+5:302017-07-27T02:04:55+5:30

शेगाव : शहरातील व्यंकटेश नगरात व रोकडिया नगर भागात भरदिवसा तीन चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन धूम स्टाइलने घरफोड्या केल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Three arrested for cinestyle burglary | सिनेस्टाइल घरफोडी करणा-या तिघांना अटक

सिनेस्टाइल घरफोडी करणा-या तिघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देचोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन धूम स्टाइलने केल्या होत्या घरफोड्या

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शहरातील व्यंकटेश नगरात व रोकडिया नगर भागात भरदिवसा तीन चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन धूम स्टाइलने घरफोड्या केल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
रोकडिया नगर येथे घरी कोणीही नसताना तीन अज्ञात मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे २२ क्वॉइन, कानातील ४ जोड, २ पोत, साखळ्या, अशा प्रकारचे ४७ ग्रॅम सोने व नगदी २० हजार रुपये चोरट्यांनी पळविले होते, तसेच दुसºया घटनेत व्यंकटेश नगरात १५ ते २० मिनिटाच्या वेळात घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दागिने व नगदी २९ हजार रुपये आणि लक्ष्मी पूजनाचे साहित्य व तीन हजार रुपये चिल्लर अशा मुद्देमालावर चोरट्याने धूम स्टाइल हात साफ करून पळ काढला होता. त्यावेळी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी लहू दगडू धंदरे, शिवानंद बबन पवार, राजू दिलीप पवार यांना अटक करून त्यांच्याजवळून सात तोळे सोने व एक मोटारसायकल असा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

Web Title: Three arrested for cinestyle burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.