निराधार आजारी व्यक्तीवर केले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:07 PM2017-10-28T15:07:21+5:302017-10-28T15:07:21+5:30

मेहकर : स्थानिक मेहकर स्टेट बँकसमोर एक आजारी व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून पडलेली होती. सदर व्यक्तीवर शिक्षक थुट्टे यांच्यासह सहकाºयांनी उपचार केले. 

teachers give treatment to roadside man | निराधार आजारी व्यक्तीवर केले उपचार

निराधार आजारी व्यक्तीवर केले उपचार

Next
ठळक मुद्देकुणाचेही नव्हते या आजारी व्यक्तीकडे लक्ष

मेहकर : स्थानिक मेहकर स्टेट बँकसमोर एक आजारी व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून पडलेली होती. सदर व्यक्तीवर शिक्षक थुट्टे यांच्यासह सहकाºयांनी उपचार केले. 
मेऐसो हायस्कूल येथील शिक्षक शिवप्रसाद थुट्टे कामानिमित्त स्टेट बँकेत गेले असता, त्यांची अतिशय खराब अवस्थेत पडलेल्या आजारी व्यक्तीवर नजर पडली. लोक रस्त्यावरुन येत होते, जात होते, पण कुणाचेही या आजारी व्यक्तीकडे लक्ष नव्हते. ही गंभीर बाब जेव्हा थुट्टे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून गल्लीतील स्थानिक नागरिक हर्षल सोमन यांच्या मदतीने १०८ नंबरवर संपर्क करुन आजारी व्यक्तीवर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर, न.प.चे कर्मचारी, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आजारी व्यक्तीला मदत केली. न.प.च्या कर्मचाºयांनी आजारी व्यक्तीची स्वच्छता केली. हर्षल सोमन यांनी कपडे दिले. यासोबतच डॉ.अतुल भिसडे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यांना समाधान नवले, आरोग्य सभापती मनोज जाधव, निलेश नाहटा, जुगराज पठ्ठे, संतोष जाधव, सिद्धेश्वर पवार, ज्ञानेश्वर मानवतकर यांनी मदत केली. यावेळी पोलिस प्रशासनाचे पोलिस नाईक, भास्कर सानप, संदीप आडवे, अशोक करे मदतीला होते. आजारी व्यक्तीची तब्येत स्थिर असून, त्याच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: teachers give treatment to roadside man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.