जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलवर ‘स्वाभिमानी’ने ओतली तूर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:00 AM2018-05-30T02:00:54+5:302018-05-30T02:00:54+5:30

बुलडाणा : शासनाने शेतकर्‍यांची तूर खरेदी केली; मात्र अद्यापही बर्‍याच शेतकर्‍यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकर्‍यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २८ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलावर तूर ओतून निषेध व्यक्त केला. 

Swabhimani poured ture on the table of District Collector! | जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलवर ‘स्वाभिमानी’ने ओतली तूर! 

जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलवर ‘स्वाभिमानी’ने ओतली तूर! 

Next
ठळक मुद्देतूर खरेदीचे चुकारे मिळाले नसल्याने संघटनेने व्यक्त केला निषेध

बुलडाणा : शासनाने शेतकर्‍यांची तूर खरेदी केली; मात्र अद्यापही बर्‍याच शेतकर्‍यांना चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकर्‍यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २८ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलावर तूर ओतून निषेध व्यक्त केला. 
शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे; मात्र खिशात पैसे नसल्यामुळे बी-बियाणे, खते खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु अद्यापही बर्‍याच शेतकर्‍यांना कर्ज मिळाले नाही. बँक अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. शासनाने नाफेड अंतर्गत शेतकर्‍यांची तूर खरेदी केली; मात्र तुरीचे चुकारे मिळालेले नाही. शेतकर्‍यांना तत्काळ तुरीचे चुकारे देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफीक करीम यांच्या नेतृत्वात जिल्हा उपनिबंधकांच्या टेबलवर तूर ओतून निषेध करण्यात आला. यावेळी कडूबा मोरे, मिस्किन शाह, सैयद जहिरोद्दीन, अजगर शाह, रामदास खसावत, हरिभाऊ उबरहंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.  

Web Title: Swabhimani poured ture on the table of District Collector!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.