केळवद येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:13 AM2017-08-10T00:13:32+5:302017-08-10T00:15:36+5:30

बुलडाणा : ऑगस्टच्या क्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेध व्यक्त करून बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील शेतकर्‍यांनी ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले.

Stop the way for farmers in Kelvad | केळवद येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको

केळवद येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देक्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेधशेतकर्‍यांच्या घामाला व शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे,वृद्धापकाळात किमान ४५00 ते ५000 रुपये सन्मानवेतन मिळायला पाहिजे, अशी  मागणी


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ऑगस्टच्या क्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेध व्यक्त करून बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील शेतकर्‍यांनी ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले.
चिखली तालुक्यातील केळवद या गावच्या रस्त्यावर प्राचार्य विष्णुपंत पाटील व अशोकराव भोसले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या घामाला व शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, किमान शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल व थोडाफार नफा शेतकर्‍यांच्या पदरात पडेल, अशी व्यवस्था जरी शासनकर्त्यांनी केली, तरी शेतकरी सन्मानाने जगू शकेल आणि कर्जमाफीच्या कुबड्या घेण्याची गरज त्याला भासणार नाही. शेतकरी वृद्धापकाळात सन्मानाने जगला पाहिजे म्हणून त्याला वयाच्या ६0 वर्षांनंतर किमान ४५00 ते ५000 रुपये सन्मानवेतन मिळायला पाहिजे, अशी  मागणी शेतकर्‍यांच्यावतीने यावेळी करण्यात आली. सदर आंदोलन शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केलेल्या आवाहनानुसार करण्यात आले. या आंदोलनात प्राचार्य विष्णुपंत पाटील, उपाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा, अशोकराव भोसले, अशोकराव गव्हाणे, गणेश निकम, ज्ञानेश्‍वर कालेकर, गुलाबराव गायकवाड, दत्ता गवते, माजी सरपंच, नंदूआप्पा बोरबळे, गजानन गायकवाड, त्र्यंबक कालेकर, सचिन निकम, दीपक पाटील, सुनील वाणी, प्रल्हाद पाटील, के.पी. पाटील, माजी सरपंच, प्रल्हाद हिवाळे, भगवान ठेंग, हरिभाऊ गवते, प्रल्हाद मोरे, शरद पाटील, सावरगाव डुकरे, अशोक गायकवाड, शेलसूर, बबन शेळके, शिरपूर, संजय पडोळसे आदींनी सहभाग घेतला.  

Web Title: Stop the way for farmers in Kelvad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.