SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:19 PM2019-06-09T14:19:54+5:302019-06-09T14:21:35+5:30

अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे

SSC Result 2019: Buldhana District First in Amravati Division | SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याचा सरासरी निकाल ७७.०७ टक्के लागला असून अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. असे असले तरी गत वर्षीच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्याचा सरासरी निकाल हा १२ टक्क्यांनी घटल्याचे वास्तव निकालाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
जिल्ह्यातील ५१८ शाळांतील ४० हजार ७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी प्रत्यक्षात ४० हजार ४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३० हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ही ७७.०७ टक्के आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७२.९६ टक्के तर मुलींचे हे प्रमाण ८२.१२ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या २२ हजार २२ हजार ९२ मुलांपैकी १६ हजार ११९ मुले उत्तीर्ण झाली. १७ हजार ९८० मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ७६५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक असून त्याची टक्केवारी ही ९०.१५ टक्के आहे. गेल्या वर्षीही सिंदखेड राजा तालुका जिल्ह्यात अव्वल होता. त्याची टक्केवारी ही ९४.९७ टक्के होती. दरम्यान, सिंदखेड राजाच्या खालोखाल चिखली तालुक्याचा ८५.८९ टक्के तर देऊळगाव राजा तालुक्याचा निकाल ८४.०९ टक्के लागलाा आहे. बुलडाणा तालुक्याचा निकाल ८३.६५ टक्के, मलकापूर तालुक्याचा ७५.९४ टक्के, खामगाव तालुक्याचा निकाल ७४.९४ टक्के, मोताला तालुक्याचा निकाल ७४.७५ टक्के, लोणार तालुक्याचा निकाल ७२.६५ टक्के, शेगाव तालुक्याचा निकाल ७२.१७ टक्के, मेहकर तालुक्याचा निकाल ७१.१६ टक्के, संग्रामपूर तालुक्याचा निकाल ६९.७९ टक्के, जळगाव जामोद तालुक्याचा ६८.८३ टक्के आणि सर्वात शेवटी तळाला नांदुरा तालुक्याचा ६७.८३ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी नांदुरा तालुक्याचाच निकाल जिल्ह्यात सर्वात कमी लागला होता.
१२ टक्क्यांनी निकालात घट
बुलडाणा जिल्ह हा अमरावती विभागामध्ये यंदा दहावीच्या परीक्षेत विभागात प्रथम आला असला तरी बुलडाणा जिल्ह्याचा गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.०९ टक्क्यांनी निकाल घसरला आहे. गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्याचा निकाल हा ८९.१६ टक्के लागला होता. यंदा तो घटून ७७.०७ टक्के लागला आहे. प्रात्याक्षीक परीक्षांचे दिले जाणारे गुण देणे बंद केल्यामुळे हा निकाल घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रश्नी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांच्याशी संपर्क साधला असता अलिकडील काळात प्रश्नपत्रिकांचे स्वरुप काहीसे बदलले आहे. काळानुरूप अभ्यासक्रमात बदल होत आहे. सोबतच ज्ञानरचनावादाच्या आधारावर प्रश्नपत्रिकांचे स्वरुप ठरू पाहत आहे. त्यामुळे घटलेला सरासरी निकाल हा प्रात्याक्षीक परीक्षांचे गुण देणे बंद केल्यामुळे घसरला असे म्हणणे संयुक्तीक ठरणार नाही.

Web Title: SSC Result 2019: Buldhana District First in Amravati Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.