भरधाव ट्रक उलटला, चालक जागीच ठार, सिंदखेडराजा ते मेहकर महामार्गावरील घटना

By संदीप वानखेडे | Published: January 15, 2024 01:23 PM2024-01-15T13:23:49+5:302024-01-15T13:24:30+5:30

हरी ओम शर्मा (रा. लटेरी, मध्यप्रदेश) असे ५२ वर्षीय मृत चालकाचे नाव

Speeding truck overturns, driver killed on the spot, incident on Sindkhedaraja to Mehkar highway | भरधाव ट्रक उलटला, चालक जागीच ठार, सिंदखेडराजा ते मेहकर महामार्गावरील घटना

भरधाव ट्रक उलटला, चालक जागीच ठार, सिंदखेडराजा ते मेहकर महामार्गावरील घटना

संदीप वानखडे, राहेरी (बुलढाणा): जालनाकडून मेहकरकडे जात असलेला भरधाव ट्रक उलटल्याने चालक जागीच ठार झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर राहेरी बु गावाजवळ १५ जानेवारी राेजी सकाळी ९वाजता घडली. हरी ओम शर्मा (रा़ लटेरी, मध्यप्रदेश, वय ५२ ) असे मृतक चालकाचे नाव आहे. जालनाकडून मेहकरकडे शीशा घेवून ट्रक क्रमांक आरजे ११ जीसी ११९० जात हाेता.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर राहेरी बु गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला धडकला़ त्यानंतर ट्रक रस्त्यावर उलटला़ पुलाचा लाेखंडी कठड्याचा तुकडा चालकाच्या पाेटात घुसल्याने हरी ओम शर्मा जागेवरच मृत्यू झाला़ अपघाताची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी, मुंडे, बारगजे आदींनी घटनास्थळावर धाव घेतली़ तसेच रस्त्यावर उलटलेला ट्रक बाजुला करून वाहतुक सुरळीत केली़ पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय वाघमारे करत आहेत.

Web Title: Speeding truck overturns, driver killed on the spot, incident on Sindkhedaraja to Mehkar highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.