शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:04 AM2017-10-24T01:04:13+5:302017-10-24T01:04:35+5:30

खामगाव :  शेतमालाची हमी भावाने खरेदी करावी, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी घाटाखालील विविध तालुक्यात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली. भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करुन मागण्यांचे निवेदन अधिकार्‍यांना देण्यात आले.

Shivsena aggressor on farmers' issues! | शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक!

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक!

Next
ठळक मुद्देघाटाखालील विविध तालुक्यांत आंदोलन शेतमालास हमी भाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  शेतमालाची हमी भावाने खरेदी करावी, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी घाटाखालील विविध तालुक्यात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली. भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करुन मागण्यांचे निवेदन अधिकार्‍यांना देण्यात आले.
खामगाव : शेतमालाला हमी भाव मिळावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन २३ ऑक्टोबर रोजी येथील तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोयाबीनची खरेदी ४ हजार ३५0 रुपये क्विंटल दराने करण्यात यावी, मूग व उडिदासाठी शासकीय खरेदी केंद्रे तालुक्यात सुरु करण्यात यावीत, कापसाची खरेदी हमी भावाने करण्यात यावी व कमी भावाने कापूस खरेदी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकर्‍यांचे पैसे शेतकर्‍यांना त्वरित देण्यात यावे, त्याचबरोबर खामगाव या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, खामगाव येथे टेक्सटाइल्स पार्कची उभारणी करण्यात यावी, या मागण्यांची शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर शहर प्रमुख सुनील अग्रवाल, तालुका प्रमुख डॉ.अनिल अमलकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख नीलेश देवताळू, प्रा.सुधिर सुर्वे, महिला आघाडी शहर प्रमुख भारती चिंडाले, उपतालुका प्रमुख अजाबराव तांगडे पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत. 

Web Title: Shivsena aggressor on farmers' issues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.