संत गजानन महाराज पालखीचे ८ जूनला पंढरपुरसाठी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 03:22 PM2019-05-19T15:22:40+5:302019-05-19T15:22:48+5:30

पायदळ वारी करीता भजनी दिंडी वारकरी, गज, अश्वासह ज्येष्ठ शु.६ अर्थात ८ जून शनिवार रोजी श्री गजानन महाराज मंदिरातून सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान होईल.

Sant Gajanan Maharaj palkhi left for on 8th June for Pandharpur | संत गजानन महाराज पालखीचे ८ जूनला पंढरपुरसाठी प्रस्थान

संत गजानन महाराज पालखीचे ८ जूनला पंढरपुरसाठी प्रस्थान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची पालखी ८ जून रोजी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे हे ५२ वे वर्ष आहे. पायदळ वारी करीता भजनी दिंडी वारकरी, गज, अश्वासह ज्येष्ठ शु.६ अर्थात ८ जून शनिवार रोजी श्री गजानन महाराज मंदिरातून सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान होईल. तत्पुर्वी, श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजतमुखवट्याचे पुजन करण्यात येईल. यानंतर विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत हजारो भक्तांच्या साक्षीने श्रींची पालखी मंदिरातून ‘गण गण गणात बोते’ असा नामघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरसाठी मार्गस्थ होईल.
‘श्रीं’ ची पालखी ८ जूनला श्री क्षेत्र नागझरी येथे दुपारी विश्रांती करून रात्री पारसला मुक्कामी राहील. ९ जून रोजी गायगाव येथे दुपारी विश्रांती, रात्री भौरद येथे मुक्कामी,  १० जून  अकोला येथे मुक्काम, ११ जून अकोला येथे मुक्काम, १२ जून भरतपूर विश्रांती, वाडेगावला मुक्काम, १३ जून देऊळगाव विश्रांती, पातूरला मुक्काम,  १४ जून मेडशीला विश्रांती, श्री क्षेत्र डव्हा येथे मुक्काम, १५ जून मालेगाव येथे विश्रांती, शिरपूर जैन येथे मुक्काम, १६ जून चिंचाळा पेनला विश्रांती, म्हसला पेनला मुक्काम, १७ जून किनखेडा येथे विश्रांती, रिसोडला मुक्काम,  १८ जून पानकन्हेरगावला विश्रांती, सेनगावला मुक्काम, १९ जून रोजी श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे विश्रांती, डिग्रस येथे मुक्काम, २० जूनला श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे विश्रांती, जवळा बाजार येथे मुक्काम, २१ जूनला अडगाव रजोबा हट्टा येथे विश्रांती, श्रीक्षेत्र त्रिधारा येथे मुक्काम, २२ जूनला परभणी येथे विश्रांती, परभणी येथेच मुक्काम, २३ जून ब्राह्मणगाव येथे विश्रांती, दैठणा येथे मुक्काम, २४ जून  खळी येथे विश्रांती, गंगाखेड येथे मुक्काम, २५ जून वडगाव दादाहरी येथे विश्रांती, परळी येथे मुक्काम, २६ जून परळी येथे विश्रांती, परळी वैजनाथ येथे मुक्काम, २७ जून कन्हेरवाडी येथे विश्रांती, अंबाजोगाईला मुक्काम, २८ जून लोचंडी सावरगाव येथे विश्रांती, बोरी सावरगाव येथे मुक्काम, २९ जून गोटेगाव येथे विश्रांती, कळंब येथे मुक्काम, ३० जून गोविंदपूर येथे विश्रांती, तेरणा साखर कारखाना येथे मुक्काम, १ जुलै किनी येथे विश्रांती, उपळा माकडाचे येथे मुक्काम, २ जुलै श्री संत ज्ञानेश्वर मंदिर येथे विश्रांती, उस्मानाबाद येथे मुक्काम, ३ जुलै वडगाव सिध्देश्वर येथे विश्रांती, श्रीक्षेत्र तुळजापूर येथे मुक्काम, ४ जुलै सांगवी येथे विश्रांती उळे येथे मुक्काम, ५ जुलै सोलापूर येथेच विश्रांती व मुक्काम, ६ जुलै सोलापूर येथेच विश्रांती व मुक्काम, ७ जुलै सोलापूर येथे विश्रांती, तिन्हे येथे मुक्काम, ८ जुलै कामती खु. वाघोली येथे विश्रांती, माचणूर येथे मुक्काम, ९ जुलै ब्रह्मपुरी येथे विश्रांती, श्रीक्षेत्र मंगळवेढा येथे मुक्काम, १० जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा येथे विश्रांती घेवून रात्री पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचले. १० ते १५ जुलै पर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या मंदिरात पालखीचा मुक्काम राहील. यादरम्यान आषाढी एकादशी उत्सवानिमित्त भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम श्री संस्थानच्या शाखेत होणार आहेत.


असा राहील परतीचा प्रवास!
श्रींची पालखी १६ जुलै रोजी पंढरपूर येथून परतीच्या प्रवासा निघेले. रात्री करकेब येथे मुक्काम, १७ जुलै कुर्मदास येथे विश्रांती कुर्डूवाडी येथे मुक्काम, १८ जुलै रिधोरे येथे विश्रांती, उपलाई स्टेशन येथे मुक्काम, १९ जुलै भगवान बार्शी येथे मुक्काम, २० जुलै माणकेश्वर येथे विश्रांती, भूम येथे मुक्काम, २१ जुलै कुंथलगिरी येथे विश्रांती, चौसाळा येथे मुक्काम, २२ जुलै उदंड वडगाव येथे विश्रांती, पाली येथे मुक्काम, २३ जुलै बीड येथे विश्रांती व मुक्काम, २४ जुलै पेडगाव येथे विश्रांती, गेवराई येथे मुक्काम, २५ जुलै राहागड येथे विश्रांती, शहापूर येथे मुक्काम, २६ जुलै पारनेर येथे विश्रांती, लालवाडी येथे मुक्काम, २७ जुलै धनगर पिंप्री येथे विश्रांती, जालना येथे मुक्काम, २८ जुलै जालना येथे विश्रांती व मुक्काम, २९ जुलै न्हावा येथे विश्रांती, सिंदखेडराजा येथे मुक्काम, ३० जुलै किनगाव राजा येथे विश्रांती, बिबी येथे मुक्काम, ३१ जुलै किनगाव जट्टू येथे विश्रांती, लोणार येथे मुक्काम, १ आॅगस्ट सुलतानपूर येथे विश्रांती, मेहकर येथे मुक्काम, २ आॅगस्ट नायगाव दत्तापूर येथे विश्रांती, जानेफळ येथे मुक्काम, ३ आॅगस्ट वरवंड येथे विश्रांती, शिर्ला नेमाने येथे मुक्काम, ४ आॅगस्ट विहिगाव येथे विश्रांती, आवार येथे मुक्काम, ५ आॅगस्ट रोजी पालखी खामगाव येथे मुक्कामी राहील. ६ आॅगस्ट रोजी पहाटे शेगावकडे रवाना होई. याप्रमाणे तब्बल ७५० किलोमीटरचा प्रवास पुर्ण करून श्रींची पालखी संतनगरीत दाखल होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sant Gajanan Maharaj palkhi left for on 8th June for Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.