बलिदान देणारे सैनिक थोर भक्तीचे प्रतीक - देवदत्त महाराज पितळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:39 PM2018-02-07T23:39:13+5:302018-02-07T23:45:49+5:30

सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाण ठेवून सैनिकांचे आचार-विचार आत्मसात करून सैनिकांनी आपल्यासाठी दिलेल्या प्राणाची आहुती हे देशासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. देशसेवेतून परमार्थ साधा, असे देवदत्त महाराज पितळे यांनी सांगितले.

Sacrificing soldiers symbol of great devotion - Devadatta Maharaj Brat | बलिदान देणारे सैनिक थोर भक्तीचे प्रतीक - देवदत्त महाराज पितळे 

बलिदान देणारे सैनिक थोर भक्तीचे प्रतीक - देवदत्त महाराज पितळे 

Next
ठळक मुद्देप्रकट दिन महोत्सव हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : देशासाठी बलिदान देणारे सैनिक थोर भक्तीचे प्रतीक आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकात बसत असणार्‍या जीवरूपी परमात्म्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाचे रान करून सैनिक शत्रूपासून आपले रक्षण करतात.  देशसेवेसाठी आपला प्राण अर्पण करतात. सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाण ठेवून सैनिकांचे आचार-विचार आत्मसात करून सैनिकांनी आपल्यासाठी दिलेल्या प्राणाची आहुती हे देशासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. देशसेवेतून परमार्थ साधा, असे देवदत्त महाराज पितळे यांनी सांगितले.
संत गजानन महाराज सेवा समितीच्यावतीने  ७ फे ब्रुवारी  रोजी डोणगाव रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवदत्त महाराज पितळे बोलत होते. या कार्यक्रमात ‘श्रीं’चा अभिषेक, जप, वृक्षारोपण, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. दुपारी  हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी जालनाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश जेथलिया, परतुरच्या नगराध्यक्ष विमल जेथलिया, लोणारचे नगराध्यक्ष भूषण मापारी, न.पा. उपाध्यक्ष बादशहा खान, जि.प. सदस्य राजेश मापारी, नगरसेवक नितीन शिंदे यांनी भेट दिली असता काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. 

Web Title: Sacrificing soldiers symbol of great devotion - Devadatta Maharaj Brat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.